Wednesday, February 3, 2016


जत-तुळजापूर पदयात्रेला 14 पासून प्रारंभ

 जत,(बातमीदार): श्रीक्षेत्र तुळजापूर येथील आदिशक्ती तुळजाभवानी देवीच्या यात्रेला जत येथील भाविक मोठ्या भक्तीभावाने पदयात्रेने दरवर्षी जातात. यंदा ही पदयात्रा 14 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारी अशी आयोजित करण्यात आली आहे.
 आठ दिवस चालणार्‍या या पदयात्रेला प्रारंभ रविवार दिनांक 14 फेब्रुवारीपासून होत आहे.सकाळी नऊ वाजता बाजार पेठेतील मारुती मंदिरापासून पदयात्रेचे प्रस्थान होणार आहे. पहिल्यादिवशी निगडी खुर्दमार्गे जाऊन येळवीला मुक्काम केला जाणार आहे. दुसर्‍या व तिसर्‍या दिवसाचा मुक्काम अनुक्रमे रड्डे आणि तळसंगी येथे असणार आहे.बुधवारी 17 ला भालेवाडीमार्गे ब्रम्हपुरीला मुक्काम असणार आहे. गुरुवारी तिर्‍हे, चौथ्यादिवशी तळे हिप्परगा येथे भाविकांकडे मुक्काम असणार आहे. शनिवारी (ता. 20 ) रोजी तालमवाडी येथे मुक्काम करून दुसर्‍या दिवशी रविवारी दुपारी बारा वाजता पदयात्रा तुळजापुरात पोहचणार आहे. या पदयात्रेत मोठ्या संख्येने भाविकांनी सामिल व्हावे, असे आवाहन पदयात्रा संयोजकांनी कळविले आहे. अधिक संपर्कासाठी सदाशिव जाधव(मामा), विठ्ठल जाधव, विष्णू जमदाडे, कोळेकर(रामपूर),सिंधूताई माली, सिंधूताई गायकवाड, श्रीमती शर्माभाभी, श्रीमती बामणे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.No comments:

Post a Comment