Monday, December 31, 2018

कर्नाळ येथे 3 रोजी पाचवे विद्यार्थी साहित्य संमेलन


अध्यक्षपासून सूत्रसंचालनपर्यंत सबकुछ विद्यार्थी
जत,(प्रतिनिधी)-
जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था व दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय विद्यार्थी साहित्य संमेलन गुरूवारी तीन जानेवारी रोजी कर्नाळ हायस्कूल कर्नाळ येथे होणार आहे. हे साहित्य संमेलन म्हणजे सबकुछ विद्यार्थी असणार आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी कु. तेजश्री जोतीराम पाटील इयत्ता नववी (तानंग) यांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती डॉ. विकास सलगर, मुश्ताक पटेल यांनी दिली.

फेब्रुवारीमध्ये येणार शिक्षक भरतीसाठी 'अच्छे दिन'

जत,(प्रतिनिधी)-
राज्यात पवित्र पोर्टलमार्फत होणार्‍या शिक्षक भरतीकडे डोळे लावून बसलेल्या तब्बल दीड ते दोन लाख उमेदवारांसाठी नवीन वर्षात आंनदाची बातमी आहे. येत्या 16 ते 22 फेब्रुवारीदरम्यान स्थानिक स्वराज्य संस्था, तसेच खासगी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये शिक्षकांच्या नियुक्त्या होणार आहेत. त्यासाठीची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे गेल्या सहा वषार्र्ंपासून शिक्षक भरतीची वाट पाहणार्‍या उमेदवारांना ‘अच्छे दिन’ येणार असल्याची माहिती शिक्षण विभागातील सूत्रांनी दिली.

शरीर संबंधास नकार देणाऱ्या विवाहितेचा खून

जत तालुक्यातील खिलारवाडीतील घटना
जत ,( प्रतिनिधी )-
खिलारवाडी (ता. जत) येथे  एका विवाहित महिलेने अनैतिक संबंध चालूच ठेवावेत, या उद्देशाने तिचा दीर  आणि त्याचा मित्र यांनी तिचा निर्घृण खून केला. तिच्या डोक्यात, पोटावर आणि तोंडावर चाकूचे वार केले. सुनीता बयाजी लोखंडे (वय 30) असे या महिलेचे नाव आहे. रविवारी रात्री ही घटना उघडकीस आली.

डीसीसी बँकेचे कॅशिअर कांबळे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार

जत,(प्रतिनिधी)-    
 सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सनमडी  शाखेचे कॅशिअर बाळासाहेब कांबळे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेच्यावतीने सत्कार करण्यात आला.

जतची यल्लमा यात्रा मोठ्या उत्साहात सुरू


हजारो भाविकांनी फेडला नवस;लाखभर भाविकांनी घेतले दर्शन
 जत,(प्रतिनिधी)-
 महाराष्ट्र व कर्नाटकातील भाविकांमध्ये प्रसिद्ध असलेल्या श्री यल्लमा देवीच्या यात्रेला आजपासून मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. यात्रेच्या मुख्य दिवसातील आजचा हा पहिला प्रमुख दिवस.हजारोंच्या संख्येने भाविकांनी गंध लेवून देवीची ओटी भरली व आपला नवस फेडला. आज दिवसभरात हजारो भाविकांनी श्रीचे दर्शन घेतले.

Sunday, December 30, 2018

दहावीच्या मुलांचा लागणार कस

जत,(प्रतिनिधी)-
पुनर्रचित अभ्यासक्रमानुसार पहिल्यांदाच होणार्‍या दहावीच्या परीक्षेत बहुसंची प्रश्‍नपत्रिकांऐवजी इंग्रजी (द्वितीय, तृतीय भाषा) व गणित (भाग-1 व 2) या विषयांसाठी एकच प्रश्‍नपत्रिका पुरविण्यात येणार आहे. पाठ्यपुस्तकांतील आशयावर आधारित; पण पाठ्यपुस्तकाबाहेरील आव्हानात्मक प्रश्‍नही परीक्षेत असणार आहेत. त्यामुळे विद्यार्थांचा कस लागणार आहे.

येत्या काही दिवसांत शेतकर्‍यांना खुशखबर मिळणार?


गेल्या सुमारे दशकभरापासून शेतकरी ही प्रत्येक राजकीय पक्षाची मतपेढी (व्होटबँक) बनलेली आहे. शेतकरी आत्महत्येचा मुद्दा उठवीत अनेकांनी तर चक्क मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार करीत सत्ताप्राप्तीचा प्रयत्नही केलेला आहे. नुकत्याच पार पडलेल्या राज्य विधान सभांच्या निवडणुकांमध्येही याच मुद्याचा वापर विरोधकांनी केला. शेतकर्यांच्या समस्यांची दखल घेत आता केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारनेही शेतकर्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देण्याचे ठरविले आहे.

भाजपाच्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीला वेग


सांगली,(प्रतिनिधी)-
तीन राज्यांमधील विधानसभा निवडणुकीतील पराभवाचा कुठलाही परिणाम पडू न देता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी पुढील वर्षी होणार्या लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार तयार सुरू केली आहे. यासाठी त्यांनी 17 राज्यांवर विशेष लक्ष केंद्रित करताना, अतिशय विश्वासातील आणि अनुभवी सहकार्यांना प्रभारी पदावर नियुक्त केले आहे.

आता सोने खरेदी करण्यासाठी मिळणार कर्ज


सांगली,(प्रतिनिधी)-
केंद्र सरकार सोन्याची प्रत्यक्ष देवाण घेवाण कमी करण्यासगठी नवे सोने धोरण आणण्याची तयारी करत आहे. नीती आयोगाने या धोरणाचा आराखडा तयार करून सरकारला पाठवला आहे. नव्या धोरणात सरकार सोन्याला संपत्ती जाहीर करू शकते. तज्ज्ञांच्या मते, सोन्याचे वर्गीकरण संपत्तीत केले तर ते खरेदी करण्यासाठी बँकेकडून कर्जेही मिळू शकते.

नोकरीची संधी


नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांसाठी खास सदर
  भारतीय रेल्वेत मेगाभरती एकूण जागा-14033. पदाचे नावज्युनिअर इंजिनीअर 13034 जागा, ज्युनिअर इंजिनीअर (आयटी) 49, डेपो मटेरियल असिस्टंट 456, केमिकल अॅण्ड मेटलर्जिकल असिस्टंट 494 जागा. ऑनलाईन अर्जाची मुदत 31 जानेवारी. अधिक माहितीसाठी www.rrbmumbai.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

दोन वा दोनपेक्षा अधिक अपत्य होऊ द्या


विजयवाडा-
 राज्य सरकारच्यावतीने दोन वा दोनहून अधिक अपत्यांना जन्म देणार्या जोडप्यांना इन्सेन्टिव देण्याची घोषणा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केली आहे. त्यामुळे तरुण जोडप्यांनी दोन वा दोनपेक्षा अधिक अपत्य होऊ द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.

शासकीय कर्मचार्‍यांना 109, तर शिक्षण क्षेत्राला 140 दिवस सुट्या


2019 मध्ये शासकीय कर्मचार्यांना सुट्ट्यांची देणगी
जत,(प्रतिनिधी)-
नव्या दिनदर्शिकेने शासकीय कर्मचारी व शैक्षणिक जगताला सुट्ट्यांची देणगी बहाल केली. त्यामुळे नोकरशाही खूश आहे. रविवारसह शासकीय कर्मचार्यांना 109 तर शिक्षण क्षेत्रात काम करणार्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्यांना 140 सुट्ट्या मिळणार आहेत.

3 ते 26 अखेर सर्व शाळांमध्ये ‘लेक शिकवा अभियान’

जत,(प्रतिनिधी)-
मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहित करण्यासाठी, मुलींच्या शिक्षणाला गती मिळावी. एकही मुलगी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी शासनाच्या महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्यावतीने दि.3 ते 26 जानेवारी अखेर सर्व शाळांमध्ये ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले लेक  शिकवा अभियान राबविण्यात येणार आहे.

(संपादकीय) मुलाच्या हव्यासाचा हकनाक बळी


सात मुलींनंतर आठव्या बाळंतपणावेळी महिलेचा मृत्यू
वंशाच्या दिव्याचा हव्यास अजून सुटलेला नाही. जग अंतराळात घर करायला निघाले असताना आणि यात मुली आघाडीवर असताना अद्यापही मुलींच्या कर्तृत्वावर विश्वास नसलेले लोक वंशाला दिवा हवाच, असा अट्टाहास ठेवतात,तेव्हा आपण गेल्या सत्तर वर्षात काही मिळवलंच नाही, असा अर्थ होतो. बीडमधल्या एका महिलेला सात मुली झाल्या तरी तिच्या घरच्यांना मुलगा हवाच होता. या लोकांनी या सात मुली कशा जगवायच्या याचा विचारसुद्धा केला नाही. त्यांना फक्त वंशाचा दिवा हवा होता. अलिकडच्या काही वर्षात अन्नभेसळ, हायब्रीडपणा यामुळे अन्नात सकसपणा राहिलेला नाही. पूर्वीप्रमाणे कष्टाची कामे राहिलेली नाहीत.

Saturday, December 29, 2018

कुंभारीचे सुपुत्र डॉ. एस.आय. पाटील सोलापूर विद्यापीठाचे प्र कुलगुरु


जत,(प्रतिनिधी)-
सोलापूर विद्यापीठाच्या प्र कुलगुरूपदी पुण्याच्या सावित्रीबाई फुलेे विद्यापीठातील पदार्थविज्ञान विभागाचे प्रा. डॉ. एस. आय. पाटील यांची नियुक्ती झाली आहे. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी ही नियुकती केली आहे. डॉ. पाटील हे जत तालुक्यातील कुंभारी गावचे सुपुत्र आहेत. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.

मोदी सर्वात महागडे पंतप्रधान


परदेश दौरा :55 महिने, 92 देश, खर्च 2 हजार 21 कोटी
नवी दिल्ली: गेल्या साडेचार वर्षांच्या कालावधीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 92 देशांना भेटी दिल्या आहेत. या भेटीसाठी मोदींच्या विदेश दौर्यावर सरकारचे 2021 कोटी रुपये खर्च झाले आहेत. त्यापैकी यंदाच्या वर्षात म्हणजे 2018 मध्ये मोदींनी 14 विदेश दौरे केले आहेत. तर मोदी हे विदेश दौर्यांसाठी सर्वात महागडे पंतप्रधान ठरले आहेत.

नवीन वर्षाचे स्वागत आता ई-कार्ड शुभेच्छापत्राने


ग्रिटिंग कार्ड हद्दपार
जत,(प्रतिनिधी)-
सोशल मीडियाद्वारे नूतन वर्षाच्या शुभेच्छा देण्याचे काम सुलभ, स्वस्त, विनामूल्य झाल्याने अनेकांनी ग्रिटिंग कार्डस्ना महत्त्व न देता व्हॉट्सअप, एसएमएस, ट्विटर, इन्स्टाग्रॉम, फेसबुक, मेसेंजर यांना पसंती दर्शविली आहे. सोशल मीडियाद्वारे देण्यात येणार्या शुभेच्छा पत्रांना ई-कार्ड शुभेच्छा म्हणूनही ओळखले जाते. अशा पत्रांनी सातत्याने उभे केलेले आव्हान स्वीकारण्यात अपयशी ठरलेला प्रिटेंड कार्ड बाजार मागे पडला आहे. या प्रिंटेड कार्डचा बाजार आता केवळ लग्नपत्रिकांमुळे थोड्याफार प्रमाणात टिकला आहे. एकूणच या व्यवसायाची सद्दी संपत आहे.

मंगळवेढ्यात गीरगाय, कुक्कुट व शेळीपालन उद्योजकता प्रशिक्षण

मंगळवेढा,(प्रतिनिधी)-
  शासन मान्यता प्राप्त श्री विठ्ठल शिक्षण प्रसारक व क्रीडा मंडळ यांच्यावतीने गीरगाय पालन, कुक्कुट पालन व बंदिस्त शेळीपालन प्रशिक्षणाचे आयोजन 2 ते 4 जानेवारी दरम्यान करण्यात आले असल्याची माहिती संस्थेच्या मुख्याधिकारी डॉ.साधना उगले यांनी दिली.

‘थापाड्या’ चित्रपट 4 जानेवारीला प्रदर्शित


सांगली,(प्रतिनिधी)-
 मानसी फिल्मस प्रॉडक्शन निर्मित मास्क ग्रुप प्रस्तुतथापाड्याहा चित्रपट 4 जानेवारी रोजी महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित करण्यात येणार असल्याची माहिती चित्रपटाचे निर्माते भाऊसाहेब भोईर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

अभिनयापेक्षाही आपल्याला दिग्दर्शनात अधिक रस

कंगना राणावत एक गुणी अभिनेत्री आहे, हे तिने अनेक चित्रपटांमधून सिद्ध केलेले आहेच; पण तिच्यामध्ये दिग्दर्शनाचेही कौशल्य आहे, हे तिने आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये यथेच्छ ढवळाढवळ करून सिद्ध केलेले होते! आता तिच्यामधील दिग्दर्शिकेला खर्या अर्थाने संधी मिळाली तीमणिकर्णिका ः द क्वीन ऑफ झांसीया चित्रपटाने. चित्रपटाचा मूळ दिग्दर्शक होता क्रिश. त्याने चित्रपटाचा बहुतांश भाग पूर्ण झाल्यावर अचानक दक्षिणेतीलएनटीआरहा चित्रपट दिग्दर्शित करण्यासाठीमणिकर्णिकासोडला. त्यानंतर या चित्रपटाचे उर्वरित काम कंगनानेच पूर्ण केले. आता तिने एका मुलाखतीत म्हटले आहे की, अभिनयापेक्षाही आपल्याला दिग्दर्शनात अधिक रस आहे. क्रिशने अचानक चित्रपट सोडल्यानंतर दिग्दर्शनाची जबाबदारी कंगनाने स्वतःकडे घेतली

एके काळी ‘रिजेक्टेड’ असल्यासारखे वाटायचे : टायगर


टायगर श्रॉफहिरोपंतीमधून आला त्यावेळी त्याचा अगदीच मऊ अवतार व सुमार अभिनय पाहून आता याचे कसे व्हायचे, असा प्रश्न जॅकी श्रॉफपासून सर्वांनाच पडला! मात्र टायगरने आपल्या उणिवा दूर करून नव्या दमाने वाटचाल सुरू ठेवली आणि आता तो हिंदी चित्रपटसृष्टीत स्थिरस्थावर झाला आहे. यावर्षी त्याच्याबागी-2’ने बंपर यश मिळवले. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने सुमारे 161 कोटी रुपयांची कमाई केली. आताबागी-3’चीही घोषणा करण्यात आली आहे. आता हे यश चाखत असलेल्या टायगरला एके काळीरिजेक्टेडअसल्यासारखे वाटत होते. याच भावनेला त्याने आपली ताकद बनवली, असे त्याने एका मुलाखतीत म्हटले आहे

आता टीकेमुळे काहीही फरक पडत नाही : कॅटरिना


अभिनेत्री कॅटरिना कैफचे म्हणणे आहे की, आता ती आपल्यावर होणार्या टीकेची बिलकुल चिंता करत नाही. एक असाही काळ होता, जेव्हा टीका व्हायची तेव्हा करिअर संपुष्टात येण्याची भीती वाटायची, परंतु आता कोणत्याही प्रकारच्या टीकेने काहीही फरक पडत नाही, असे स्पष्ट केले आहे.

इतक्या लवकर आईची भूमिका करेन असे वाटले नव्हते : तन्वी

तन्वी डोग्राने स्टार भारतवरील जीजी माँमध्ये पदार्पण करून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली होती. याला बराच काळ झाला आहे आणि तिने स्वत:ला जिजी माँची भूमिका बजावणारी एक चांगली अभिनेत्री म्हणून सिद्ध केले आहे. शो जिजी माँ हे मनोरंजक वळण घेईल आणि बहिणीकडून बायको, कन्या आता शोमध्ये एक आई असेल. तन्वी डोग्राने स्टार भारतवरील जीजी माँमध्ये पदार्पण करून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. तिने आता मोठा पल्ला गाठला असून, जीजी माँची भूमिका करून स्वत:ला सिद्ध केले आहे.

नर्गिस फाकरी येतेय घाबरवायला


नर्गिस दिसायला सुंदर आहे. तिची व्यक्तिरेखा नेहमी रोमँटिक दाखवली जाते. नर्गिस फाकरी म्हटले की, समोर येते तिची रोमँटिक इमेज. तिचा रॉकस्टार सिनेमा असो नाहीतर हाऊसफुल 3 तिचा स्वीट लूक आठवतो. मात्र आता हीच नर्गिस घाबरवायला येते आहे. नर्गिसचा नवा सिनेमा रिलीज होणार आहे. त्याचं नाव आहे अमावस. बर्याच मोठ्या ब्रेकनंतर अभिनेता सचिन जोशी परत सिनेमात येतोय. या सिनेमात तो नर्गिसचा नायक आहे. अमावसचा ट्रेलर रिलीज झालाय. तो पाहून अंगावर काटाच येतोय.

या कारणामुळे अर्जुनपासून दूर झाला रणवीर

बाबा आजकाल खूप बिझी आहे. तो पानिपतसाठी कठोर मेहनत घेत आहे व यामध्ये तो शानदार प्रदर्शन करेल.बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग व अर्जुन कपूर रीलपासून वेगळ्या असलेल्या रिअल लाइफमध्येही खूप चांगले मित्र आहेत. हे दोघे गुंडे या चित्रपटात एकत्र दिसून आले होते

पंतप्रधान मोदी 9 जानेवारीला पंढरपूर, सोलापूर दौर्‍यावर


पंढरपूर,(प्रतिनिधी)-
 पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बुधवार, 9 जानेवारी 2019 रोजी सोलापूर आणि पंढरपूरच्या दौर्यावर येत असून त्यांच्या हस्ते विविध विकासकामांची उद्घाटने आयोजित करण्यात आली आहेत. मोदी यांचा अधिकृत दौरा अद्याप आला नसला तरी तसे संकेत मिळाले आहेत, अशी माहिती सहकारमंत्री सुभाष देशमुख आणि भाजपचे  प्रा. अशोक निंबर्गी यांनी दिली.

Friday, December 28, 2018

आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्ञानाचे आदान-प्रदान झाले पाहिजे

प्राचार्य  अभयकुमार साळुंखे
जत,(प्रतिनिधी) -
विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये दिवसेंदिवस बदल होत आहेत. नवनवीन शोध लागत आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक ज्ञानसंपन्न माणसे आहेत. त्यांच्या ज्ञानाचा उपयोग संपूर्ण जगाला झाला पाहिजे म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर अशा परिषदांचे आयोजन होऊन ज्ञानाचे आदान-प्रदान झाले पाहिजे,असे प्रतिपादन स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य  अभयकुमार साळुंखे यांनी केले.

बिळूर जि .प. गटात पाण्याचे टँकर, चारा छावणी सुरू करा

जत,(प्रतिनिधी)-
पावसाअभावी जत तालुक्यात पिण्याच्या पाण्याचा व जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला असून यामुळे लोकांचे हाल होत आहेत. प्रशासनाने तात्काळ बिळूर जिल्हा परिषद गटात तात्काळ पाण्याचे टँकर आणि चारा छावण्या सुरू कराव्या,अशी मागणी बसर्गीचे उपसरपंच किशोर बामणे यांनी उपजिल्हाधिकारी किरण कुलकर्णी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

जि.प. तोडफोड: संशयितांना 4 दिवसांची कोठडी


सांगली,(प्रतिनिधी)-
 जत तालुक्यातील संख गावातील राष्ट्रीय पेयजल योजनेत गैरव्यवहार करणार्यांवर कारवाई करण्याची मागणी करत गुरुवारी सांगलीत जिल्हा परिषदेत तोडफोड करणार्या नऊ जणांना कोर्टाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. अटक केलेल्यांमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विकास देशमुख, स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांचा समावेश आहे.

यल्लमादेवी यात्रेत खिलार जनावरे, शेतीमालाचे प्रदर्शन


जत,(प्रतिनिधी)-
 सांगली जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती व श्रीमंत विजयसिंहराजे डफळे दुय्यम बाजार आवार जत यांच्या संयुक्त विद्यमाने यल्लम्मादेवी यात्रेनिमित्त खिलार जनावरे व शेतीमाल प्रदर्शनाचे उद्घाटन सोमवार, दि. 31 रोजी सकाळी 11 वाजता कोल्हापूर येथील विभागीय सहनिबंधक सहकारी संस्थेचे धनंजय डोईफोडे यांच्या हस्ते होणार आहे. यासाठी विविध मान्यवरांची उपस्थिती राहणार असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती दयगोंडा बिरादार यांनी दिली.

जिल्हा परिषदेकडे 72 वैद्यकीय अधिकार्‍यांची भरती करणार: तम्मनगौडा रवी


जत,(प्रतिनिधी)-
 प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रात वैद्यकीय अधिकार्यांची पदे रिक्त असल्याने जिल्हा परिषदेने कंत्राटी पद्धतीने 72 पदे भरण्याचा निर्णय घेतला असल्याचे आरोग्य सभापती तम्मनगौडा रवी-पाटील यांनी सांगितले. या पदांमुळे उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रातील गैरसोय टळणार आहे.

पाणी फौंडेशनच्या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन


 जत,(प्रतिनिधी)-
राज्यातील बिकट झालेला पाणीप्रश्न सोडवण्याची ताकद लोकांमध्येच आहे. लोकांच्या ताकदीला जागृत करून या विषयातील विज्ञानात लोकांना प्रशिक्षित करण्यासाठी आमीर खान आणि किरण राव यांनी 2016 साली पाणी फौंडेशनची स्थापना केली. त्यातून झालेल्या कामाचे चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन आमदार विलासराव जगताप यांच्याहस्ते करण्यात आले.

जत पालिकेत 17 कोटीचा निधी पडून


जत,(प्रतिनिधी)-
पालिकेत अधिकारी, सत्ताधार्यांमध्ये उदासीनता असल्याने सतरा कोटींचा निधी पडूनही शहराचा विकास होत नाही, यासारखे दुर्दैव नाही. या ठिकाणी भ्रष्टाचाराशिवाय काही चालत नाही, असा आरोप आमदार विलासराव जगताप यांनी जत येथे जाहीर सभेत बोलताना केला.

लोकसभेपूर्वी शिक्षकांची भरती पूर्ण करण्याची मागणी


सांगली,(प्रतिनिधी)-
 लोकसभेपूर्वी शिक्षक भरती करून नियुक्तिपत्रे देण्याचे आश्वासन दिले असले तरी त्याबाबत सुरू असणारे काम पाहता ही प्रक्रिया पूर्ण होईल का, याबाबत शंका निर्माण होत आहे. ’पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरती करण्याचे शासनस्तरावरून प्रयत्न सुरू आहेत. मात्र, तांत्रिक अडचणीचे कारण पुढे करून अद्यापही भरती प्रक्रिया सुरू केलेली नाही. प्रत्यक्षात बिंदूनामावलीसह अनेक प्रक्रिया प्रलंबित असल्याने प्रशासनाने ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, या मागणीचे निवेदन पवित्र शिक्षक संघर्ष समितीच्यावतीने मुख्य कार्यकारी अधिकार्यांना देण्यात आले.

जनतेची दिशाभूल करणे म्हणजेच गुजरात पॅटर्न : प्रतीक पाटील


जत,(प्रतिनिधी)-
 लोकसभेसाठी इच्छुक असलो, तरीही पक्ष निर्णय घेईल, तो मान्य असेल. काँग्रेसमधील मतभेद दूर करून एकत्रित येऊन ही लोकसभा व विधानसभा लढविली जाणार आहे. पक्ष सांगेल तो निर्णय अंतिम राहील. विशाल पाटील, विश्वजित कदम आम्ही सर्वजण एकत्रितपणे आगामी निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. भाजप सरकारचे आता पितळ उघडे पडले आहे. जनतेतून आता भाजपविरोधी लाट निर्माण झाली आहे. ‘जनतेची दिशाभूल म्हणजेच गुजरात पॅटर्नआहे. आमच्याकडून काही चुका झाल्या असतील त्या आता परत होणार नाहीत, असे प्रतिपादन माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांनी पत्रकार बैठकीत केले.

नववर्षाचे स्वागत करा; मात्र अतिउत्साह टाळा

जत,(प्रतिनिधी)-
जत व परिसरात नववर्षाचे स्वागत मद्य प्राशन करून कराल तर त्यांच्या नववर्षाची सुरुवात पोलिस कोठडीत होणार आहे; त्यामुळे नववर्षाचे स्वागत करा,पण अति उत्साह टाळा,असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

जत निबंधक कार्यालयास ‘स्वाभिमानी’कडून टाळे

जत,( प्रतिनिधी)-
उमराणी (ता. जत) येथील मल्लिकार्जुन विकास सहकारी सोसायटीने राज्यशासनाच्या कर्जमाफी वरील एक लाख वीस हजार रुपयांची व्याजआकारणी चुकीच्या पध्दतीने  केली आहे. या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जत येथे सहाय्यक निबंधक (सहकारी संस्था) कार्यालयास टाळे ठोकले. तसेच शासनाचा निषेध केला.

काँग्रेस लोकसभेला तगडे आव्हान उभे करणार का?


जत,(प्रतिनिधी)-
लोकसभेचे पडघम वाजायला लागले आहेत. सांगली लोकसभा मतदारसंघात मात्र यहां तो सब शांती शांती आहे, म्हणण्याची वेळ आली आहे. कारण लोकसभेच्या निवडणुका तीन-चार महिन्यावर येऊन ठेपल्या असताना काँग्रेसच्या गोठात शांतताच दिसून येत आहे. लोकसभेची उमेदवारी कुणाला मिळणार,याचाच खल सध्या सुरू आहे. माजी मंत्री प्रतीक पाटील यांना डावलले जाणार का, असाच सवाल सध्या तरी ज्याच्या त्याच्या तोंडी आहे. सांगली लोकसभा मतदारसंघात भाजप आणि काँग्रेस अशीच पारंपारिक लढत होणार, अशी चिन्हे असून विद्यमान खासदार संजय पाटील हेच पुन्हा भाजपाचे उमेदवार असतील, असे बोलले जात असले तरी श्री. पाटील यांना पुन्हा लोकसभेची लॉटरी लागणार का, याबाबत सांशकता व्यक्त केली जात आहे.

(संपादकीय) गुप्तांग कापण्याचे महिलेचे धाडस


माणसं कायदा हातात घेण्याचा प्रकार अलिकडच्या काळात वाढला आहे. माणसांकडला सहिष्णुता प्रकार संपला आहे आणि कायद्याचे रक्षक म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते,त्या पोलिसांवरचा विश्वास उडाला आहे. राजकीय लोकांच्या दावणीला बांधले गेलेले हे खाकी वर्दीतले खाते खायच्याबाबतीतही आघाडीवर आहे. अशा या खात्यावर कुणाचा विश्वास बसणार? त्यामुळे महिलांची आणि अन्याय सहन करणार्या लोकांची सहनशीलता संपते तेव्हा अक्रित घडायला लागतं.खरे तर आपल्या देशाच्यादृष्टीकोनातून याचे समर्थन करता येत नाही. पण सगळेच उपाय थकतात,तेव्हा कायदा हातात घेण्याशिवाय पर्याय उरत नाही. मुंबईतल्या डोंबवली परिसरात घडलेली घटना त्यामुळेच धक्कादायक म्हणायला हवी. एका छेड काढणार्या इसमाच्या वारंवारच्या त्रासाला कंटाळून तिने त्याला धडा शिकवण्याचाच निर्णय घेतला. आणि आपल्या मित्रांच्या साथीने छेड काढणार्याचे गुप्तांगच कापून टाकले.

आसंगी(जत) शाळेचे तालुका क्रीडा स्पर्धेत यश

जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील आसंगी येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय विविध क्रीडा प्रकारात उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

Thursday, December 27, 2018

राज्य सरकारी कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग लागू


मुंबई,(प्रतिनिधी)-
दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर राज्य सरकारी- निमसरकारी कर्मचारी व निवृत्तिवेतन धारकांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय घेऊन सरकारने नवीन वर्षाची भेट दिली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत गुरुवारी हा निर्णय घेण्यात आला.

शेतकरी संघटनेची जिल्हा परिषदेत तोडफोड


सांगली,(प्रतिनिधी)-
 जत तालुक्यातील संख येथील राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत नळपाणी पुरवठा योजनेसाठी साडेपाच कोटी रुपये खर्च करूनही पाणी मिळत नाही व दीड वर्षांपासून पाठपुरावा करूनही दोषींवर कारवाई होत नसल्याचा आरोप करीत आक्रमक झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषदेच्या महिला कक्ष अधिकारी जखमी; संख पाणी योजनेप्रकरणी गुन्हे दाखलसाठी आक्रमक होत कार्यालयावर हल्लाबोल केला.

मोटेवाडी येथे शॉर्टसर्किटने घर जळाले


 जत,(प्रतिनिधी)-
 महावितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे मोटेवाडी (आसंगी तुर्क, ता. जत) येथे महाळप्पा आंबाजी कोकरे यांचे घर गुरुवारी शॉर्टसर्किट होऊन घर जळाले. यामध्ये दोन लाखांचे नुकसान झाले आहे. यामध्ये एक मोटरसायकल, एक सायकल; तसेच अन्नधान्य, कपडे, भांडी, घरात ठेवलेली 50 हजार रोख रक्कम; तसेच सबमर्सिबल मोटर जळून खाक झाली. त्यामुळे या दुष्काळात तो शेतकरी रस्त्यावर आला आहे. याबाबत वरिष्ठांनी लक्ष घालून त्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील यानी केली.

उड्डाणपुलाच्या उदघाटनासाठी अमित शहा सांगलीत


सांगली,(प्रतिनिधी)-
 आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सांगलीतील भारतीय जनता पक्षाने पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना निमंत्रण दिले आहे. त्यांनीही यासाठी हिरवा कंदील दर्शविला आहे. सांगलीतील वारणाली रेल्वे उड्डाणपुलाचे उद्घाटन 24 जानेवारी रोजी शहा यांच्याहस्ते करण्यात येणार असल्याची माहिती भाजप कार्यालयातून देण्यात आली.

विराटने मोडला द्रविडचा 16 वर्षे जुना विक्रम

जत,(प्रतिनिधी)-
 टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने मेलबर्न कसोटीत राहुल द्रविडचा एक विक्रम मोडीत काढला. आपल्या खेळीचे रुपांतर शतकी खेळीत करण्यात अपयश आले असले तरी त्याने परदेशात एका वर्षात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आपल्या नावे केला. या वर्षात विराटने आतापर्यंत 1138 धावांची खेळी केली.

नव्या वर्षातील पाच ग्रहणांपैकी भारतीयांना दिसणार फक्त दोन

 सांगली,(प्रतिनिधी)-
 नवे वर्ष हे अवकाश क्षेत्रासाठी खास वर्ष असेल, याचे कारण म्हणजे 2019 मध्ये वर्षभरात तीन सूर्यग्रहणे आणि 2 चंद्रग्रहणे होणार आहेत. यातील विशेष बाब म्हणजे, यातील 2 ग्रहणे ही भारतातून दिसू शकणार आहेत.

दीडपट बाजारभावाचे आश्‍वासन देणार्‍या सरकारविरुद्ध संताप

तुरीला आधारभूत किमतीपेक्षा तब्बल हजार रुपये कमी दर

जत,(प्रतिनिधी)-
दुष्काळामुळे यंदा उत्पादनात 80 टक्क्यांहून अधिक घट होऊनही सध्या तुरीचे बाजारभाव सरकारने जाहीर केलेल्या आधारभूत किमतीपेक्षा कमी म्हणजे 4500 ते 4800 रुपये प्रतिक्विंटल असल्याने शेतकर्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. शेतकर्यांना सांगलीत जाऊन तूर विक्री करणे, आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. यामुळे शेतकर्यांना उत्पादनाच्या दीडपट बाजारभाव मिळवून देऊ, अशी वल्गना करणार्या सरकारविरुध्द तूर उत्पादक शेतकर्यांकडून संताप व्यक्त होत आहे.

फ्लिपकार्टचा बंपर मोबाइल सेल

2000 ते 4500 रुपयांची सूट
सांगली,(प्रतिनिधी)-
 ऑनलाइन शॉपिंग कंपनी फ्लिपकार्टने आपल्या ग्राहकांसाठी पुन्हा एकदा बंपर सेल आणला आहे. हिवाळी हंगामाच्या पार्श्वभूमीवर कंपनीने हा सेल आणला आहे. 29 डिसेंबरपर्यंत हा सेल असणार आहे. या सेलमध्ये ग्राहकांना स्मार्टफोनवर भरघोस सूट मिळणार आहे. फ्लिपकार्टने या सेलमध्ये स्मार्टफोनवर एक्स्चेंज ऑफरची सोय दिली आहे. या सेलमध्ये अॅपलच्या आयफोन एक्सआर 59,600 रुपये तर 46,700 रुपयांमध्ये गुगल पिक्सेल-3 मिळणार आहेत.

सांगलीत आमच्याकडे बलाढ्य उमेदवार


सांगली,(प्रतिनिधी)-
 सांगली लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार कोण असेल हे राष्ट्रवादीला विचारूनच ठरेल. देशात आघाडी करताना ते धोरण ठरलेले आहे. येथे बलाढ्य उमेदवार आघाडीकडे असून तो कोण, हे योग्यवेळी जाहीर केले जाईल, अशी भूमिका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट केली.

विविध धर्माचे नव वर्ष


डिसेंबर महिना आला की-प्रत्येकाला नवीन वर्ष साजरे करण्याची हुरहुर लागते आणि मग ते साजरे करण्याचे नियोजन सुरू होते. मित्र-मैत्रिणींबरोबर बाहेर हॉटेलमध्ये जायचे की, कुटुंबीयांसमवेत घरीच कार्यक्रम आयोजित करून साजरे करायचे, याबाबत विचारविनिमय सुरू होतो. महाराष्ट्रात गुढीपाडव्याला नववर्ष साजरे केले जात असले, तरी 1 जानेवारीचेही आपल्या दैनंदिन व्यवहारात अतिशय महत्त्व आहे. आपले सण हे मराठी महिन्यांप्रमाणे साजरे होत असले, तरी बाकीचे व्यवहार मात्र इंग्रजी महिन्यांप्रमाणेच चालतात. त्यामुळे या इंग्रजी नववर्षालाही तेवढेच महत्त्व आहे. विविधतेने नटलेल्या भारतवासीयांचे नववर्ष वेगवेगळ्या दिवशी साजरे केले जाते.

चहा: इथला आणि तिथला


विविधतेने नटलेल्या भारतीय खाऊगल्लीत खाद्यसंस्कृतीच्या अप्रतिम मेळाचे प्रकार आपण पाहतो आहे. पण प्रत्येक प्रांतात, धर्मात दिवसाची सुरुवातचहाच्याएकतेचा प्यालाने होते. तर जाणून घेऊया या चाहाच्या प्यालाला! भारत आणि चहाचा मेळ इंग्रजकाळात झाला. प्रवासादरम्यान आसाममधील स्थानिकपेयाने त्यावेळच्या लॉर्ड वैटिकचे लक्ष वेधून घेतले. त्यांनी भारतात चहाची परंपरा रुजवणे त्याचे उत्पादन करण्याकरिता 1934 मध्ये एका समितीचे गठण केले गेले. यानंतर 1935 मध्ये आसाममध्ये चहाचे बाग लावले गेले आणि भारत चहाचा उपभोगता व उत्पादकता म्हणून पुढे आला.

मनाला चेतना देणारा शब्द: आठवण


आठवणएक अतिशय साधा शब्द. मनाच्या खोल अंतरंगातून उमटणारा शब्दआठवण!’ प्रत्येकजण वापरत असतो असा प्रचलित शब्द आठवण. प्रत्येक श्वासागणिक मानवी मनाला चेतना देणारा शब्द आठवण. आठवणीत माणूस कायम रमत असतो. असा एक ही क्षण जात नाही, ज्याने माणसाला कशाची आठवण येणार नाही अथवा होणार नाही. प्रत्येक आठवणीत माणूस जगत असतो. आठवणी या माणसाला कायम वेगळ्या विश्वात घेऊन जात असतात. या आठवणीच त्याच्या सदैव सोबत करत असतात.

मराठी चित्रपटांना आले चांगले दिवस


अलिकडच्या काही वर्षात मराठी चित्रपटाने कात टाकली आहे. नवनवीन विषय, नाविण्यपूर्ण हाताळणी यामुळे मराठी चित्रपटांकडे बघण्याचा दृष्टीकोन आता बदलला आहे. 2018 या वर्षातही हीच प्रतिमा कायम ठेवत मराठी चित्रपट आणि कलाकारांनी आपला ठसा उमटविला. कलात्मक सादरीकरण, दमदार अभिनय आणि गुणवत्तापूर्ण विषय- लिखाणातून प्रत्येक वेळी प्रेक्षकांसाठी काही नवीन देण्याचा प्रयत्न यशस्वी ठरला. वर्षाच्या सुरुवातीलाच प्रदर्शित झालेलाये रे ये रे पैसाहा रोहित शेट्टीच्या स्टाईलचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धडकला. संजय जाधव दिग्दर्शित आणि सिद्धार्थ जाधव, उमेश कामत आणि तेजस्विनी पंडितच्या प्रमुख भूमिका असलेल्या या पूर्णत: मनोरंजक चित्रपटाने चांगली कमाई केली. संजय जाधवचे दिग्दर्शन आणि दर्जेदार अभिनयासाठीही हा चित्रपट चर्चेत राहिला.

जुगार अड्ड्यावर छापा ;42 हजारांचा मुद्देमाल जप्त

जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील  गिरगाव येथे पत्त्याच्या पानांचा जुगार खेळत असताना उमदी पोलिसांच्या पथकाने चार  जणांना ताब्यात घेतले तर आणखी दोघे पसार झाले. या प्रकरणी रोख रक्कम आणि वस्तूंच्या रुपात पोलिसांनी सुमारे 42 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

आसंगी तुर्कचा कबड्डी संघ तालुक्यात प्रथम

जत,(प्रतिनिधी)-
जत पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्यावतीने घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत मोठ्या गटात मुलींच्या संघाने तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला.

ग्रामरोजगार सेवक संघटनेचे धरणे आंदोलनजत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील ग्रामरोजगार सेवकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आज जत तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.या आंदोलनाच्या ठिकाणी येऊन  अनेक राजकीय, सामाजिक क्षेत्रातील लोकांनी पाठिंबा दर्शविला.

Wednesday, December 26, 2018

धनगर समाजाच्या आरक्षणासाठी दिल्लीला जाणार


माजी आमदार प्रकाश शेंडगे
जत,(प्रतिनिधी)-
 पंढरपूर येथे शिवसेनेच्या महामेळाव्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी धनगर समाजाच्या आरक्षणाच्या लढ्यात सहभागी होऊ, असे आश्वासन दिल्याने आपण धनगर समाजातर्फे ठाकरे यांच्या भूमिकेचे स्वागत करतो. धनगर समाजाचा आरक्षणासाठी आता धनगर समाजाचे नेतेही एक शिष्टमंडळ घेऊन दिल्लीला जाणार असल्याचे धनगर समाजाचे नेते माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

शाळा सोडल्याचे बनावट दाखले देणारी टोळी अटकेत


सांगली,(प्रतिनिधी)-
 शाळा सोडल्याचे बनावट दाखले देणारी टोळी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने बुधवारी पकडली. या टोळीमध्ये माजी शिक्षकाचा समावेश आहे. टोळीकडून तासगाव तालुक्यातील चिंचणी येथील डी. के. पाटील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाच्या नावे बनावट दाखले, शिक्के, गुणपत्रिका जप्त करण्यात आल्या आहेत.  याप्रकरणी त्या विद्यालयाचा माजी शिक्षक किरण गणपत होवाळे (वय 42, रा. सरस्वतीनगर, वासुंबे ता. तासगाव), अशोक किसन इंगळे (वय 30), हणमंत तिमाप्पा गोल्लार (वय 25) दोघेही रा. संजय गांधी झोपडपट्टी, सांगली), बशीर बाळू मुल्ला (वय 38, वडर कॉलनी, सांगली) या चौघांना अटक करण्यात आली आहे.

शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांशी मुख्यमंत्र्यांचा ‘लोकसंवाद’


सांगली,(प्रतिनिधी)-
 शासनाच्या विविध योजना गरजूंपर्यंत पोहोचल्यानंतर त्यातून होणारा लाभ, त्यात येणार्या अडचणी आणि आवश्यक सुधारणा याची माहिती स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसलोक संवादसाधून जाणून घेणार आहेत. त्यासाठी या लाभार्थ्यांशी थेट संवाद साधण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे.

शिधापत्रिकेस आधार जोडले नसल्यास धान्य नाही!


सांगली,(प्रतिनिधी)-
अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून शिधापत्रिकांची पडताळणी आणि सदस्य पडताळणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार ज्या शिधापत्रिकाधारकांचा आधार क्रमांक जोडला नसेल त्यांनी 31 डिसेंबरपर्यंत स्वस्त अन्न धान्य विक्री केंद्रावर जाऊन आधार क्रमांक जोडणी करून घ्यावी. तसेच कुटुंबातील सदस्यांची देखील आधार क्रमांकाची जोडणी करून घ्यावी, अन्यथा नवीन वर्षापासून धान्य मिळणार नसल्याचे पुरवठा विभागाकडून जाहीर करण्यात आले आहे.

गाडी आडवी मारल्याने दोघांना बेदम मारहाण


जत,(प्रतिनिधी)-
 बाज (ता. जत) येथे गाडी आडवी मारल्याने दोघांना तलवार, काठी व गजाने मारहाण करण्यात आली. अण्णासो नाना खरात व विकास विलास खरात अशी मारहाण करण्यात आलेल्या व्यक्तींची नावे असून याबाबत सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जत नगरपरिषदेच्या भ्रष्टाचाराची जाहीर पोलखोल


आमदार जगताप घेणार जाहीर सभा
जत,(प्रतिनिधी)-
 जत नगर परिषदेच्या सत्ताधारी मंङळीनी गेल्या वर्षभरात 17 कोटीचा निधी पडून असून सत्ताधार्यांच्या भ्रष्ट कारभाराचा लेखाजोखा करण्यासाठी येथील मारुती मंदिरासमोर आज आम दार विलासराव जगतापााच्या उपस्थितीत जाहीर सभा होणार असल्याची माहिती नगरसेवक विजय ताड यांनी दिली.

अन्न व औषध प्रशासनाची अकरा ठिकाणी कारवाई


सांगली,(प्रतिनिधी)-
 अन्न व औषध प्रशासनाने आस्थापनेत त्रुटी आढळलेल्या 11 ठिकाणी कारवाई करून 54 हजार 500 रुपयांचा दंड वसूल केला आहे. दुकाने, हॉटेल्स आणि इतर आस्थापनांचा समावेश आहे. सुरुवातीच्या तपासणीत आढळलेल्या त्रुटी दूर करण्याची संधी दिल्यानंतरही काही आस्थापनांनी त्याची दखल घेतली नव्हती. त्यामुळे त्यांच्याविरुध्द तडजोड प्रकरणे दाखल करण्यात आली होती. त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.

संख पाणी योजनेची चौकशी करण्यासाठी सांगलीत उपोषण


सांगली,(प्रतिनिधी)-
 संख (ता. जत) येथील राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत 6 वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेले नळपाणी पुरवठा योजनेचे काम अद्याप अपूर्ण असून या कामात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाला आहे. शासनाचे कोट्यवधी रुपये खर्च होऊनही लोकांना पाणी नाही. याबाबत वारंवार मागणी करूनही प्रशासनाकडून काहीच कारवाई होत नसल्याचा निषेध करीत जत तालुका शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेसमोर उपोषण सुरू करण्यात आले आहे.

डॉ. रवींद्र आरळी यांनी साधी पाणपोई सुरू करून दाखवावी


नीलेश बामणे यांचा प्रतिटोला
जत,(प्रतिनिधी)-
 कर्नाटकातून पाणी आणण्याची नौटंकी करण्याऐवजी भाजपचे नेते डॉ. रवींद्र आरळी यांनी स्वतः प्रथम आत्मपरीक्षण करावे. जतसाठी आपले योगदान काय आहे, हे तपासावे व जतकरांसाठी एखादी स्वखर्चातून पाणपोई तरी सुरू करून दाखवावी; मगच काँग्रेसचे नेते विक्रम सावंत यांच्यावर टीका करावी, असा प्रतिटोला नगरसेवक नीलेश बामणे यांनी पत्रकार परिषदेत लगावला.

जतची यात्रा पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज


तहसीलदार सचिन पाटील यांची माहिती
जत,(प्रतिनिधी)-
 31 डिसेंबर 2018 पासून सुरू होणार्या महाराष्ट्र व कर्नाटकातील लाखो भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या श्री यल्लम्मा देवीच्या यात्रेसाठी प्रशासन व श्री यल्लामादेवी देवस्थान ट्रस्ट सज्ज असून यात्रा सुरळीत पार पडण्यासाठी चोख नियोजन करण्यात आल्याची माहिती तहसीलदार सचिन पाटील यांनी यात्रेच्या नियोजन बैठकीत सांगितले.

महिलेचा विहिरीत उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न

लहान मुलाचा मात्र मृत्यू

जत,(प्रतिनिधी)-
आसंगी - जत  ( ता. जत ) येथील संगीता भानुदास गडदे ( वय २२ ) या विवाहित महिलेने सव्वा महिन्याच्या  बाळाला  ( पुरुष ) बरोबर घेऊन बाळाला विहिरीच्या काठावर ठेवून  विहिरीत उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला .परंतु सदरची विवाहिता गंभीर असून तिच्यावर मिरज शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत .तर बाळाचा भुकेने व्याकूळ होवून व थंडीमुळे  मृत्यू झाला आहे .ही घटना काल सकाळी साडे साडे अकरा वाजण्याच्या दरम्यान उघडकीस आली आहे.

तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांना उत्साहात प्रारंभ


सभापती सुशिला तावंशी यांच्या हस्ते उदघाटन
जत,(प्रतिनिधी)-
जत पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्यावतीने तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांना जत येथे मोठ्या उत्साहात प्ररंभ झाला. तीन दिवस चालणार्या या क्रीडा स्पर्धेचे  उदघाटन जत पंचायत समितीच्या सभापती सौ. सुशिला तावंशी यांच्याहस्ते झाले. यावेळी गटशिक्षणाधिकारी बी.एन.जगधने, पंचायत समिती सदस्या श्रीदेवी जावीर, विनायक शिंदे, के.एम.हायस्कूलचे मुख्याध्यापक रियाज सय्यद उपस्थित होते.

Tuesday, December 25, 2018

दलित वस्ती योजनेंतर्गत जत शहरात पावणे दोन कोटी रुपयांच्या कामास प्रारंभ


जत,(प्रतिनिधी)-
 जत शहरातील तीन प्रभागांम ध्ये दलितवस्ती योजनेंतर्गत 1 कोटी 80 लाख रुपयाच्या नवीन कामास काँग्रेस नेते, जिल्हा परिषद सदस्य तथा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विक्रम सावंत यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. समारंभास नगराध्यक्षा शुभांगी बन्नेनवर, उपनगराध्यक्ष आप्पा पवार, नाना शिंदे, इकबाल गवंडी, स्वप्नील शिंदे, भूपेंद्र कांबळे, लक्ष्मण एडके, नामदेव काळे, प्रवीण जाधव, आदी उपस्थित होते.

चारा छावणीसाठी एक जानेवारीपासून नाव नोंदवा: तुकाराम महाराज


जत,(प्रतिनिधी)-
 जत तालुक्यातील भीषण दुष्काळी परिस्थितीने जनतेचे जीवन विस्कळीत झाले असून पाण्यासोबत जनावरांच्या चार्याचा प्रश्न गंभीर स्वरूप धारण करत आहे. लोकांवर स्थलांतरित होण्याची वेळ आली आहे. त्यामुळे माणसाने माणसासाठी काहीतरी केले पाहिजे, या भावनेतून तालुक्यात 158 दिवस संघर्ष दुष्काळाशी या उपक्रमातून मोफत 101 सिंटेक्स पाण्याच्या टाक्यांचे वाटप करण्यात येणार आहेत; तसेच जनावरांसाठी मोफत चारा छावणी उभारण्याचा संकल्प टाकला आहे. यासाठी एक जानेवारीपासून शेतकर्यांनी नोंदणी करावी, असे आवाहन चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती तुकाराम महाराज यांनी पत्रकार बैठकीत केले.

दुष्काळग्रस्त गावातील शेतीपंपाचे वीज बिल माफ करा: संजय तेली


जत,(प्रतिनिधी)-
 जत तालुक्यात दुष्काळाची स्थिती भयानक झाली असून दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांना आणि शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी दुष्काळग्रस्त गावातील शेतीपंपाचे वीज बिल शासनाने माफ करावे, अशी मागणी उमदी (ता. जत) येथील संजय तेली यांनी केले.

जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकर्‍यांना सक्षम बनवणार: दिलीप पाटील


जत,(प्रतिनिधी)-
 सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकरी सोसायट्या व ग्राहक सक्षम बनविणार असून मध्यवर्ती बँकेने शेतकर्यांसाठी विविध योजना तयार केल्या असून द्राक्ष, डाळिंब कर्जमर्यादा वाढविण्यात आल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील यांनी दिली. जिल्हा बँकेच्या वतीने जत ग्राहक संपर्क अभियानांतर्गत आयोजित मेळाव्यात ते बोलत होते.