Thursday, September 27, 2018

व्हसपेठमध्ये लांडग्यांनी केल्या 10 मेंढ्या फस्त


जत,(प्रतिनिधी)-
 जत तालुक्यातील व्हसपेठ येथील तांबे वस्तीवर लांडग्याने रात्री अकरा वाजता धुमाकूळ घालून मेंढ्याच्या कळपावर हल्ला करुन दहा मेंढ्या फस्त केल्या. त्यामुळे तांबे वस्तीवर मोठा घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. यात एक लाख वीस हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
तांबेवस्तीवरील बिराप्पा पांडुरंग तांबे यांचे घरावर बुधवारी रात्री 11 वाजता चार ते पाच लांडग्याच्या कळपाने अचानक हल्ला केला. कुटुंबातील सर्व लोक घरात झोपले होते त्यामुळे रात्री आलेल्या लांडग्याची चाहूल लागली नाही. मेंढ्यांच्या ओरडण्याने घरातील सर्व लोक बाहेर आल्यानंतर हा प्रकार लक्षात आल्यानंतर दंगा केल्यानंतर शेजारील वस्तीवरील ग्रामस्थ येईपर्यंत लांडग्याने पळ काढला. तलाठी व वनरक्षक हुग्गे, डॉ. . एस. राठोड यांनी घटनास्थळी पंचनामा केला. यामध्ये एक लाख वीस हजार रुपयाचे नुकसान झाले आहे.

No comments:

Post a Comment