Wednesday, September 26, 2018

सांगली जिल्ह्यात ठाकरे स्मृती योजनेतून 11 ग्रामपंचायत इमारती


जत,(प्रतिनिधी)-
राज्य सरकारने एक हजार पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या आणि स्वत:ची इमारत नसलेल्या ग्रामपंचायतींना बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत इमारत बांधणी ही योजना सुरू केली आहे. या योजनेतून सांगली जिल्ह्याला 11 ग्रामपंचायतींना इमारती मंजूर झाल्या आहेत.
जत तालुक्यातील वाषाण, आटपाडी तालुक्यातील कामथ व धावडवाडी, तासगाव तालुक्यातील धोंडेवाडी आणि पानमळेवाडी, मिरज तालुक्यातील मानमोडी आणि रसुलवाडी, खानापूर तालुक्यातील शेंडगेवाडी आणि भडकेवाडी तसेच शिराळा तालुक्यातील शिंदेवाडी आणि शिवारवाडी या गावांना ग्रामपंचायत इमारती मंजूर झाल्या आहेत.
24 सप्टेंबर 2018 रोजी काढण्यात आलेल्या शासन आदेशात राज्यातील 121 ग्रामपंचायतींचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे. या इमारत बांधकामासाठी राज्य शासन 90 टक्के रक्कम देणार असून उर्वरीत दहा टक्के रक्कम स्वनिधीतून बांधल्या जाणार आहेत. राज्य सरकारने ग्रामसंसद भक्कम करण्याच्या दृष्टीने अनेक निर्णय घेतले आहेत. ग्रामसभेला जादा अधिकार, मुख्यमंत्री पेयजल योजना, लोकनियुक्त सरपंच असे महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. आता ज्या ग्रामपंचायतींना स्वत:ची इमारत नाही. अशा छोट्या ग्रामपंचायतींना स्वत:ची इमारत असावी, यासाठी विशेष निधी देण्याचे धोरण आखले होते.

No comments:

Post a Comment