Thursday, September 13, 2018

जत शहरात 15 तर तालुक्यात 45 गणेशमूर्तींची स्थापना


यंदा गणेश मंडळांची संख्या झाली कमी
जत,(प्रतिनिधी)-
 यावर्षीपासून गणेश मंडळांवर लावण्यात आलेले निर्बंध आणि दुष्काळी परिस्थिती यामुळे जत शहरात फक्त 15 आणि तालुक्यात 45 गणेश मंडळांनी गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली. गेल्यावर्षी तब्बल 200 हून गणेश मंडळांनी गणेशाची प्रतिष्ठापना केली होती. धर्मदाय आयुक्तांकडे गणेशोत्सव मंडळांची नोंदणी करणे आवश्यक होते. यंदा प्रथमच ऑनलाइन नोंदणी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
दरम्यान,जत शहर व तालुक्यातील अनेक गावागावांत मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने गणेशाची स्थापना करण्यात आली. गणेशाच्या स्वागतासाठी सजावट साहित्य, पूजासाहित्य व प्रसादाची खरेदी करण्यासाठी शहरातील बाजारपेठेत प्रचंड गर्दी होती. जत शहर व तालुक्यातील विविध गणेशोत्सव मंडळाने गणेशाच्या आगमनाची जोरदार तयारी केली होती. लोखंडी पूल, जत वाचनालय, गांधी चौक, मंगळवार पेठेत गणेशमूर्ती विक्रीचे स्टॉल उभारण्यात आले होते.
 या वर्षी प्रथमच शाडूच्या मूर्तीची मागणी वाढली असल्याचे दिसून आले. ‘आला रे आला गणपती आलाऽऽऽया जयघोषात गणपती घरी घेऊन गेले तर अनेक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी वाजत गाजत गणपती घेऊन गेले.रात्री उशीरापर्यंत मंडळांचे गणेशमूर्ती वाजतगाजत घेऊन जात होते. चार दिवसांपासून शहरात सजावटीचे साहित्य बाजारपेठेत लावण्यात आले होते. ते खरेदी करण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती. बाजारपेठेत एलईडी लाईट सजावटीकरिता आवश्यक असणारे प्लास्टिकची फुले नानाविध प्रकारच्या दिव्यांना भाविकांनी मागणी केली होती. सुबक प्रसन्न व मनोभावे आवडेल अशी गणेशमूर्ती मिळावी यासाठी भाविकांनी गणेशमूर्तीची करून घेऊन गेले.
 गणेशोत्सव काळात जत शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त लावला आहे. पोलिस निरीक्षक राजू तहसीलदार यांनी दिवसभर स्वतः बाजार पेठेत फिरवून अतिक्रमण काढण्याचा प्रयत्न केला. बंदोबस्तासाठी जलद कृती दल महिला व पुरुषांची एक तुकडी तैनात करण्यात आली होती. जत पोलिस स्टेशनचे पोलिस 25 होमगार्ड तैनात करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक राजीव तहसीलदार यांनी दिली. मंङळाची संख्या कमी जत तालुक्यात सतत पङत असलेल्या दुष्काळामुळे गणेश मंङळाची संख्या कमी झाली असून यावषीॅ जत शहरात 15 व परिसरातील गावात 45 मंङळांनी गणेशमूर्तीची स्थापना केल्याचे जत पोलिस ठाण्याच्या वतीने सांगण्यात आले.

No comments:

Post a Comment