Sunday, September 9, 2018

राज्य ग्रंथालय संघाच्यावतीने 19 ला धरणे आंदोलन

राज्य ग्रंथालय संघाच्यावतीने 19 ला धरणे आंदोलन

जत,(प्रतिनिधी)-
    राज्य सरकार  सार्वजनिक ग्रंथालये आणि सेवक यांच्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी चालढकल करत असल्याने राज्य ग्रंथालय संघाच्यावतीने राज्यभर प्रत्येक जिल्ह्याच्या  जिल्हाधिकारी  कार्यालयासमोर 19 सप्टेंबर रोजी धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सांगली जिल्ह्यातील ग्रंथालये यादिवशी बंद ठेवून आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा संघाचे अध्यक्ष एकनाथ जाधव यांनी केले आहे.
   श्री.जाधव म्हणाले,महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ व्यवस्थापक मंडळाची सभा दि. 1सप्टेंबर 2018 रोजी वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम या ठिकाणी संपन्न झाली.सदर सभेमध्ये सार्वजनिक ग्रंथालये व सेवक यांच्या प्रश्नांची सोडवणूक न केल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याचे ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 19 सप्टेंबर रोजी एका दिवसाचे धरणे आंदोलन करण्यात यावे असे ठरले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व शासनमान्य ग्रंथालये बंद ठेऊन  जिल्हाधिकारी कार्यालय ,सांगली येथे सकाळी 11 वाजता सर्व ग्रंथालयाचे पदाधिकारी, संचालक मंडळ,ग्रंथालय सेवक तसेच जिल्हा ग्रंथालय संघाचे पदाधिकारी, संचालक मंडळ,जिल्हा सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी कृती समितीचे पदाधिकारी, संचालक मंडळ या सर्वांनी वेळेवर उपस्थित राहून आंदोलन शांततेत पार पाडून यशस्वी करावे, असे आवाहन केले.
   यावेळी  सांगली जिल्हा ग्रंथालय संघाचे कार्यवाह भगवानराव शिंदे, सांगली जिल्हा सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी संघ कृती समितीचे अध्यक्ष विनोद ठोंबरे,संघाचे जत तालुकाध्यक्ष राजेंद्र खांडेकर,सचिव अमर जाधव उपस्थित होते.

No comments:

Post a Comment