Wednesday, September 19, 2018

संखमधील शिबिरात 304 नेत्र रुग्णांची तपासणी


जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील संख येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या मोफत नेत्र तपासणी शिबिरात 304 रुग्णांची तपासणी करण्यात आली. शिवाय 26 रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या पुढाकाराने नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. उदघाटन आमदार विलासराव जगताप यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार श्री. जगताप म्हणाले, ग्रामीण भागातले लोक आरोग्याची फारशी काळजी करत नाहीत. आजार अंगावर काढतात. त्यामुळे आजार बळावतो. त्यामुळे मोठ्या आर्थिक नुकसानीला किंवा जीवाला मुकावे लागते. लोकांनी वरचेवर आरोग्याची तपासणी करावी, असे आवाहन केले.
शिक्षण व आरोग्य सभापती तम्मणगौडा रवी-पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विविध आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. लोकांनी याचा लाभ घ्यावा. यावेळी डॉ. डी.जी. पवार यांनी मोतीबिंदूविषयी मार्गदर्शन केले.
यावेळी पं..माजी सभापती आर. के.पाटील, अप्पर तहसीलदार नागेश गायकवाड, तालुका निरीक्षक के.एल. बारपत्रे, डॉ. .बी.नाईक,नेत्र चिकित्सक डॉ. व्ही.बी. बजंत्री आदी उपस्थित होते.No comments:

Post a Comment