Saturday, September 22, 2018

मटणाच्या रश्श्यात पडून बालिकेच्या मृत्यू


जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील संख येथे मटणाच्या रश्श्याच्या पातेल्यात पडून  एका चार वर्षाच्या बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सायंकाळी घडली. साक्षी योगेश कांबळे असे या दुर्दैवी मुलीचे नाव असून मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचार घेत असताना काल तिचा मृत्यू झाला.
योगेश कांबळे यांच्या घरी मोहरमनिमित्त मांसाहरी जेवण करण्यात आले होते. सायंकाळी  अचानक पाऊस आल्याने रश्श्याचे पातेले उचलून घरात आणून ठेवण्यात आले. यावेळी घरात खेळत असलेली साक्षी रश्श्याच्या पातेल्याजवळ गेली आणि त्यात पडून ती गंभीर जखमी झाली. घरातल्या लोकांनी तिला बाहेर काढून तात्काळ गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. मात्र डॉक्टर आणि रुग्णवाहिका काहीच उपलब्ध नसल्याने तिला खासगी वाहनाने मिरजेच्या शासकीय रुग्णालयात आणण्यात आले. तिला तिथे दाखल करून उपचार सुरू करण्यात आले.परंतु, काल सकाळी तिचा मृत्यू झाला. साक्षीचे वडील गवंडी काम करतात. साक्षीचा मृत्यू झाल्याने कुटुंबासह गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 


No comments:

Post a Comment