Wednesday, September 26, 2018

रामराव महाविद्यालयात ‘महिला उद्योजगता’ भित्तीपत्रिकेचे उद्घाटन

 जत,(प्रतिनिधी)-
जत येथील राजे रामाराव महाविद्यालयात वाणिज्य विभागाच्या वतीने ‘यशस्वी  महिला उद्योजक’ या विषयावर तयार करण्यात आलेल्या भित्तीपत्रिकेचे उद्घाटन प्राचार्य डॉ. व्ही.एस.ढेकळे यांच्या हस्ते करण्यात झाले.
वाणिज्य विभागाच्या विद्यार्थ्यांनी उद्योग क्षेत्रात ज्या-ज्या महिलांनी आपला स्वतंत्र ठसा उमटविला अशा महिला उद्योजकांची माहिती संकलित करून भित्तीपत्रिकेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही.एस.ढेकळे म्हणाले कि, महिलांच्यामध्ये क्रयशक्ती मोठ्या प्रमाणात आहे. त्यांच्यामध्ये प्रचंड उर्जा आहे. त्या उर्जेच्या जोरावरच रिचा कोर, एकता कपूर, चंदा कोचर, आदिती गुप्ता, इंदू जैन, किरण मुझामदार यासारख्या भारतीय महिलांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर उद्योग क्षेत्रात आपला स्वतंत्र ठसा उमटविला आहे. या यशस्वी महिला उद्योजकांचा आदर्श आजच्या महिला आणि  विद्यार्थिनींनी आपल्या समोर ठेवला पाहिजे.
प्रारंभी प्रा.अशोक हेरवाडे यांनी भित्तीपत्रिका आयोजन करण्यामागील भूमिका स्पष्ट केली. प्रा.डॉ.सोमनाथ काळे, प्रा.आर जे गोरे व प्रा.अशोक बोगुलवार यांनी भित्तीपात्रीकेसाठी परिश्रम घेतले.


 (यशस्वी महिला उद्योजक या भित्तीपत्रिकेचे उद्घाटन करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही.एस. ढेकळे, प्रा. अशोक हेरवाडे,प्रा.सिद्राम चव्हाण)

No comments:

Post a Comment