Tuesday, September 11, 2018

संखमध्ये मतिमंद युवतीवर बलात्कार


जत,(प्रतिनिधी)-
दोन महिन्यापूर्वीच बलात्कार करून एका अल्पवयीन मुलीचा खून केल्याचे प्रकरण ताजे असतानाच जत तालुक्यातल्या संखमध्ये आणखी एक बलात्कार प्रकरण पुढे आले आहे. संबंधित युवती मतिमंद असून आता ती सात महिन्याची गर्भवती असल्याचे उघड झाले आहे.
या प्रकरणी अज्ञातावर उमदी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. ही 26 वर्षाची युवती आपल्या आईसोबत संखमध्ये राहते. तिची आई कामानिमित्त बाहेर जात असल्याने ही युवती घरात एकटीच असते. याचा गैरफायदा घेऊन अज्ञाताने तिच्यावर बलात्कार केला. त्यातून ती गर्भवती राहिली आहे. तिला त्रास होऊ लागल्याने तिच्या आईने तिला दवाखान्यात दाखवले. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तिची चाचणी केल्यानंतर ती सात महिन्याची गर्भवती असल्याचे उघड झाले. या प्रकरणी तिच्या आईने आणि संखचे पोलिस पाटील सुरेश पाटील यांनी उमदी पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक भगवान शिंदे करत आहेत.

No comments:

Post a Comment