Monday, September 10, 2018

गोवर व रुबेला लसीकरणासाठी कार्यशाळा


जत,(प्रतिनिधी)-
जत येथील पंचायत समितीच्या सभागृहात जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्यावतीने गोवर व रुबेला लसीकरणासंबंधी नुकतीच कार्यशाळा घेण्यात आली. अध्यक्षस्थानी जि.. शिक्षण व आरोग्य सभापती तम्मणगौडा रवी-पाटील होते.
या कार्यशाळेचे उदघाटन डॉ. रवींद्र आरळी यांच्याहस्ते झाले. यावेळी बोलताना डॉ. आरळी म्हणाले, लसीकरणाअभावी भारतात दरवर्षी पन्नास हजार बालकांचा मृत्यू होत आहे. ही संख्या घटवण्यासाठी लहान मुलांना ज्या आवश्यक लसी आहेत, त्या वेळेवर देणे गरजेचे आहे. सांगली जिल्हा परिषदेने गावपातळीवर गोवर,रुबेला लसीकरणाचे आयोजन केले आहे. प्राथमिक शाळांच्यामाध्यमातून शेतकर्यांच्या मुलांपर्यंत या लसीकरणाचा उपक्रम पोहचवला जाणार आहे, याचा लाभ लोकांनी घ्यावा.
यावेळी पं..सभापती मंगल जमदाडे, उपसभापती शिवाजी शिंदे, गटविकासाधिकारी अर्चना वाघमळे,श्रीदेवी जावीर, डॉ. विवेक पाटील,डॉ. काजल श्रीवास्तव,डॉ. विद्याधर पाटील,डॉ. बी.टी. पवार, डॉ. अभिजीत पवार, डॉ. नांद्रेकर, डॉ. अभिजीत चौथे, आर.डी. शिंदे, गौस खतीब, भगवान पवार उपस्थित होते.

No comments:

Post a Comment