Monday, September 24, 2018

वादविवाद स्पर्धेत के.एम.हायस्कूलचे यश

जत,(प्रतिनिधी)-
जत पोलीस ठाण्याच्यावतीने शहरातील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या नुकत्याच वादविवाद स्पर्धा घेण्यात आल्या. यात के.एम.हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा तृतीय क्रमांक आला.
जत येथील राजे रामराव महाविद्यालयात या स्पर्धा पार पडल्या.स्पर्धेचा विषय होता,महिलांवरील अत्याचार कायद्याने कमी होतील की समाज प्रबोधनाने.या स्पर्धा जत पोलीस ठाण्याच्या निर्भया पथकाच्यावतीने घेण्यात आल्या.या स्पर्धेत के.एम. हायस्कूलच्या कु.प्रतिषा भोसले आणि ऋतिक कांबळे या विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन तृतीय क्रमांक पटकावला. या विद्यार्थ्यांना पोलीस उपनिरीक्षक वर्षा डोंगरे यांच्याहस्ते बक्षीस देऊन गौरवण्यात आले.त्यांना निलेश तुराई आणि मुख्याध्यापक आर.एम.सय्यद यांचे मार्गदर्शन लाभले.

No comments:

Post a Comment