Thursday, September 13, 2018

तुकाराम महाराज यांच्यावतीने गणेशमूर्तींचे वाटप


 जत,(प्रतिनिधी)-
 श्री सद्गुरू बागडे बाबा यांच्या 24 व्या पुण्यतिथी व गणेश चतुर्थी निमित्त चिकलगी भुयार (ता. मंगळवेढा) येथे मठाचे मठाधिपती तुकारामबाबा महाराज यांच्यावतीने गणेश उत्सव मंडळांना मोफत 75 गणेश मूर्तीचे वाटप करण्यात आले.
 ग्रामीण भागात गणेशोत्सव मंडळाला देणगीदार अभावी अनेक तरुणांना उत्सव साजरा करता येत नाही. दुष्काळी परिस्थिती असल्याने वर्गणी कोणी देत नाही. पण अशा मंडळांना गणेशोत्सव साजरा करावयांचा असतो. ही त्यांची इच्छा लक्षात घेऊन  गेल्या वर्षांपासून हा स्तुत्य उपक्रम तुकाराम (बाबा) महाराज यांनी सुरु केला. गणेश मंडळांना एक आर्थिक मदत करण्यापेक्षा गणेश मूर्ती मोफत वाटप करण्याचा निर्णय घेतला. शिवाय शालेय मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. गेल्या वर्षी एक्कावन्न गणेशोत्सव मंडळाने आपली नोंदणी केली होती. यावर्षी 75 गणेशोत्सव मंडळाने आपली नावे नोंदणी केली होती या सर्व मंडळांना गणेशमूर्तीचे वाटप करण्यात आले. भविष्यात एकशे एक गणेश मंडळांना मूर्तीचे वाटप करण्याचा मानस असून यावेळी तुकाराम बाबा यांनी गणरायाला पाऊस पाडावा असे साकडे घातले. यावेळी हजारोंच्या संख्येने भक्त वर्ग उपस्थित होता.

No comments:

Post a Comment