Monday, September 17, 2018

लक्ष्मण बोराडे यांची निवड


जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील शेगाव येथील माजी सरपंच  लक्ष्मण बोराडे यांची अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या अशासकीय समितीवर निवड झाली आहे. त्यांना निवडीचे पत्र महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, उपाध्यक्ष संजय पवार, जिल्हा समन्वयक सर्जेराव पाटील यांनी दिले आहे. निवडीनंतर बोलताना श्री.बोराडे म्हणाले, सांगली जिल्ह्यातील तरुणांना बिनव्याजी कर्ज योजनेचा लाभ मिळवून देऊच शिवाय या महामंडळाचा गरिब जनतेला कसा होईल,या दृष्टीने प्रयत्न केले जातील.

No comments:

Post a Comment