Monday, September 10, 2018

म्हैसाळ योजनेचे पाणी सोडण्याची मागणी


जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील हिवरे गावच्या ग्रामस्थांनी म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे आवर्तन सुरू करण्याची मागणी खासदार संजयकाका पाटील यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. सरपंच सविता बंडगर व अन्य ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, चार महिन्यापासून म्हैसाळ योजनेचे आवर्तन बंद आहे. मान्सून पावसाने दगा दिल्याने खरिप वाया गेला आहे. त्यातच पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. हिवरेसह धावडवाडी, कुंभारी, प्रतापपूर,डोर्ली, तिप्पेहळी या भागात पाणी टंचाई तीव्र झाली आहे. परतीच्या पावसाचा भरवसा नाही. खरिप तर वाया गेला आहे, निदान रब्बी पिकासाठी तरी पाण्याची गरज आहे. त्यामुळे म्हैसाळचे आवर्तन सुरू करण्याची आवश्यकता आहे.यावेळी उपसरपंच भागवत शिंदे, माजी उपसरपंच दगडू शिंदे, शहाजी भोसले आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment