Saturday, September 15, 2018

वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र आता ऑनलाईन


जत,(प्रतिनिधी)-
जिल्ह्यातील सर्व परिवहन वाहनधारकांनी वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी <http://www.parivahan.gov.in> या संकेतस्थळावर ऑनलाईन अपॉईटमेंट घ्यावी, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी व्ही.डी. कांबळे यांनी केले आहे. उपप्रादेशिक्षक परिवहन अधिकारी श्री. कांबळे यांनी सांगितले की, अपॉईटमेंट घेण्याच्या दोन दिवस अगोदर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहनांचा तपशील संगणकात नोंदवण्यासाठी मूळ कागदपत्रांसह उपस्थित राहावे. अपॉईटमेंट घेतलेल्या दिवशी वाहन तपासणीकरिता उपलब्ध न केल्यास पुन्हा अपॉईटमेंट घ्यावी लागणार असून पुन्हा शुल्क भरावा लागणार आहे. त्यामुळे अपॉईटमेंट घेतलेल्या दिवशीच वाहन तपासणीसाठी हजर करावे.

No comments:

Post a Comment