Thursday, September 13, 2018

कीटकनाशक फवारणी प्रबोधन फेरीचे उद्घाटन


जत,(प्रतिनिधी)-
 सांगली जिल्हा परिषदेच्या कृषी विभाग व जत पंचायत समिती कृषी विभाग यांच्यावतीने कीटकनाशक फवारणी विषयीच्या प्रबोधन फेरी जत शहरातून काढण्यात आली. या फेरीचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे आरोग्य व शिक्षण सभापती तम्मनगौडा रवी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी सभापती मंगल जमदाडे, उपसभापती शिवाजी शिंदे, गट विकास अधिकारी अर्चना वाघमळे, श्रीदेवी जावीर, कांताप्पा खोत, कृषी अधिकारी अमोल कुमार सदाकळे, एस. एस. सावंत, जे. झेड. सांगलीकर, अर्जुन सौदे. सदाशिव जाधव, सत्यवान मद्रेवार उपस्थित होते. आरोग्य सभापती तम्मनगौङा रवी पाटील म्हणाले, जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या वतीने कीटकनाशक फवारणी करताना काळजी घेतल्यास जीवाला धोका उत्पन्न होणार नाही. याबाबतचे मार्गदर्शन गावागावांमध्ये करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment