Monday, September 10, 2018

बाबरवस्ती शाळेत शालेय साहित्य वाटप


जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील बाबरवस्ती (पांडोझरी) येथील  जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेतील विद्यार्थ्यांना मुंबई येथील  धनगर समाज सेवा संघाच्यांच्यावतीने आनंदराव हाक्के यांच्या हस्ते वह्या,पेन व जिलेबी- पेढे वाटप करण्यात आले. यावेळी शाळेत राबवण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांचे कौतुक करण्यात आले.
आनंदराव हाक्के म्हणाले, सामाजिक बांधिलकी जपणे गरजेचे असून मातीला आपण कधीच विसरणार नाही. कारण या मातीतूनच माणूस म्हणून जगण्याचे बळ मिळाले. शाळेत राबवले जाणारे उपक्रम, वृक्ष संगोपन, बोलक्या भिंती पाहून ते भारावून गेले. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सविता मोटे, शोभा बाबर, कविता कोरे विशाल गोड, सत्यवान हाक्के, केरबा गडदे उपस्थित होते. शाळेतील शिक्षक दिलीप वाघमारे यांनी सर्वांचे स्वागत केले.

No comments:

Post a Comment