Monday, September 10, 2018

सुनील साळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्यकारणीवर


जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील येळवी येथील माजी सरपंच व सावली फौंडेशनचे अध्यक्ष सुनील साळे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या सांगली जिल्हा कार्यकारणीवर नुकतीच निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे नेते सुरेश शिंदे यांनी त्यांना सदस्य निवडीचे पत्र दिले.
यावेळी श्री. साळे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नगरसेवक टीमू एडके, स्वप्निल शिंदे, रवी मानवर, पवन कोळी, राहूल शिंदे, बाजी केंगार, पिराजी शिंदे, शिवाजी आवटे,सुहास शिंदे आदी उपस्थित होते. श्री. साळे सत्काराला उत्तर देताना म्हणाले की, जत तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाढीसाठी प्रयत्न करतानाच तालुक्यातील लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहू. पक्षाने दिलेली जबाबदारी निष्ठेने पार पाडू.

No comments:

Post a Comment