Wednesday, September 19, 2018

निगडी खुर्दमध्ये तीन पानी जुगार अड्ड्यावर छापा


जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील निगडी खुर्द येथील तीन पानी जुगार अड्ड्यावर जत पोलिसांनी छापा टाकून 2 लाख 77 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी 4 जुगार्यांना ताब्यात घेतले असून अन्य चार पळून जाण्यात यशस्वी झाले. या प्रकरणी जत पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निगडी खुर्द गावालगत असलेल्या लक्ष्मण गुराप्पा चंदनशिवे यांच्या शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये बेकायदा तीन पानी जुगार अड्डा चालू होता. या प्रकरणी जत पोलिसांना टीप मिळली. त्यानुसार पोलिस निरीक्षक राजू तासीलदार यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी छापा टाकला. यात 5 दुचाकी, 5 मोबाईल आणि रोख रक्कम 8 हजार 900 तसेच जुगाराचे साहित्य यासह 2 लाख 77 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. राजू परगोंडा पुजारी (वय 38), सोमाण्णा चन्नाम्मा पुजारी (वय 47 दोघेही राहणारे गुड्डापूर ता.जत), सुभाष तुकाराम हुवाळे (वय 47, निगडी खुर्द), नामदेव कृष्णा साळे ( वय 38, काराजनगी) या चार जुगार्यांना पोलिसांना ताब्यात घेतले आहे. तर आणखी चारजण पसार झाले. त्यांचा तपास सुरू आहे.
या कारवाई पथकात सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन गढवे, अप्पासाहेब कत्ते, पोलिस कर्मचारी श्री. भोर, सचिन जवंजाळ, गोपाळ राठोड, अभिजीत यमगर यांचा समावेश होता.

No comments:

Post a Comment