Saturday, September 8, 2018

व्हॉटस् अ‍प:जरा शांतपणे विचार करा
जरा शांतपणे विचार करा
10 वर्षांपूर्वी 35 ते 40 अंश सेल्सियस असलेल्या तापमानाने आज 43 चा आकडा पार केला आहे. पुढील साधारण 5 वर्षात पारा 45 अंशाची पातळी ओलांडेल. असे करत करत एक दिवस पारा 60 अंशांवरसुद्धा पोहोचेल. तेव्हा अशी रडायची वेळ येईल, की आहे ती झाडेही वाळतील. तुमचा हजारो रुपयांचा एसीसुद्धा काम करु शकणार नाही. दिल्लीवाले पण बुलेट ट्रेनने पाणी पाठवणार नाहीत. आपला जिल्हा, राज्य आणि पर्यायाने देश वाळवंट व्हायला वेळ लागणार नाही. हे टाळण्यासाठी काय कराल? पावसाळा सुरु आहे. प्रत्येकाने किमान 5 झाडे लावा. 3 वर्ष पोटच्या मुलासारखे त्यांचे संगोपन करा. पाणी वाचवण्याचा आणि जिरवण्याचा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. भूगर्भातील पाण्याची पातळी वाढवण्याचा प्रयत्न करा. 5 वर्षात 2 कोटी 50 लाख झाडे लावा! मनापासून विचार करा आणि कामाला लागा..! दर रविवारी घरातून बाहेर पडा आणि सुट्टीचा एक दिवस पर्यावरण संरक्षण व संवर्धनासाठी द्या.


 तहान लागलेली असताना कोरड्या ओठांतून गोडच शब्द बाहेर पडतात. मात्र, एकदा का तहान भागली, की मगपाण्याची चवआणिमाणसाचे नशीबदोन्ही बदलतात. जोपर्यंत ठीक आहे, तोपर्यंत देवाला दुरूनच हात जोडतात थोडेसे काही कमी पडायला लागले, की लगेच देवळात जाऊन नारळ फोडतात.बायको रात्री दोन वाजता उठून नवर्याला प्रश्न करते.
बायको : त्रिदेवमध्ये तीन नायिका कोणत्या होत्या?
नवरा : माधुरी दीक्षित, संगीता बिजलानी आणि सोनम
बायको : 2003 विश्वचषकमध्ये पाकिस्तान विरुद्ध सचिनने किती धावा केल्या?
 नवरा : 98 धावा
 बायको : आपल्या बाजूची कविता आपल्या बिल्डिंगमध्ये कधी राहायला आली?
नवरा : बुधवारी दोन महिने पूर्ण होतील. पण तू असे प्रश्न का विचारतेस?
बायको : काल माझा वाढदिवस होता!
भयाण शांतता.
No comments:

Post a Comment