Wednesday, September 19, 2018

व्यायाम, योग्य आहाराने आजारापासून मुक्तता: - डॉ. रवींद्र आरळी


जत,(प्रतिनिधी)-
योग्य आहार घेऊन रोज व्यायाम करा तरच शरीर सदृढ राहून आजारापासून सुटका मिळेल. आजच्या  तरुणांनी व्यसनांपासून दूर राहावे, असे आवाहनही स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. रवींद्र आरळी यांनी माडग्याळ येथे बोलताना केले.
जत तालुक्यातील माडग्याळ येथील तिरंगा गणेश मंडळाच्यावतीने आयोजित आरोग्यविषयक व्याख्यानात मार्गदर्शन करताना डॉ. आरळी बोलत होते. डॉ. आरळी म्हणाले, प्रत्येक माणसाच्या प्रतिकारशक्तीवर कोणताही आजार बरे होण्याचे अवलंबून असते. प्रतिकारशक्ती चांगली राहण्यासाठी संतुलित जेवण, आहारामध्ये पालेभाज्या, तंतुमय फळभाज्यांचा समावेश असावा. तसेच तळलेले पदार्थ कमी खाल्ले पाहिजेत. पाणी भरपूर पिणे, योगासन करणे, या गोष्टी पाळणे गरजेचे आहे.
वजन कमी करण्यासाठी उपवास करू नका, त्याचा परिणाम हे उलट वजन वाढण्यास मदत होते. रोज 45 मिनिटे व्यायाम केला पाहिजे. यावेळी त्यांनी तिरंगा गणेश मंडळाचे कौतुक करताना या मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत असे जनजागृती कार्यक्रम घेऊन आदर्श निर्माण केला असल्याचे म्हटले. यावेळी डॉ. शेखर हिट्टी, डॉ. चंद्रमणी उमराणी, नगरसेवक प्रकाश माने, डॉ. सार्थक हिट्टी उपस्थित होते.
No comments:

Post a Comment