Monday, September 10, 2018

तलाठी संघाच्या तालुकाध्यक्षपदी जगताप;उपाध्यक्षपदी बागेळी


जत,(प्रतिनिधी)-
राज्य तलाथी व मंडल अधिकारी संघटनेच्या जत तालुकाध्यक्षपदी बाळासाहेब जगताप यांची तर उपाध्यक्षपदी शंकर बागेळी आणि अक्षय बंडगर यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. या निवडी संघटनेच्या कार्यकारणीच्या बैठकीत गुप्त मतदान पद्धतीने पार पडल्या.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून राज्य उपाध्यक्ष गौस लांडगे यांनी काम पाहिले. यावेळी जिल्हा अध्यक्ष विजय तोडकर, सरचिटणीस सुहास औताडे उपस्थित होते.निवडीनंतर बोलताना बाळासाहेब जगताप म्हणाले, संघटनेच्या माध्यमातून तालुक्यातील संघटनेच्या सभासदांच्या अडीअडचणी सोडवण्याचा प्रयत्न करू. संघटनेला बळकटी आणण्याबरोबरच सभासदांच्या भावी आयुष्यासाठी नवनवीन योजना राबवण्याचा प्रयत्न करू.

No comments:

Post a Comment