Tuesday, September 18, 2018

बिळूर येथील बेकायदा दारूअड्ड्यावर छापा


जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील बिळूर येथील एका बेकायदा दारू अड्ड्यावर स्थानिक गुन्हा अन्वेषण पथकाने छापा टाकून सुमारे पाच हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
विळूर गावाच्या हद्दीत महांतेश दुंडाप्पा धोडमनी (वय 27) याच्या दारू अड्ड्यावर छापा टाकून 1 हजार 440 रुपये किंमतीच्या देशी दारूच्या बाटल्या 23 बाटल्या जप्त केल्या. तर राजू मलकाप्पा कामगोंड (वय 48) याच्या अड्ड्यावर 3 हजार 432 रुपयांच्या 66 देशी बाटल्या मिळून आल्या. ही कारवाई मंगळवारी करण्यात आली.

No comments:

Post a Comment