Tuesday, September 11, 2018

उमराणी-येळवी-जाडरबोबलाद रस्त्याला राज्यमार्गाचा दर्जा


जत,(प्रतिनिधी)-
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभाग जोडणार्या उमराणी-जत-निगडी खूर्द-येळवी-जाडरबोबलाद या जिल्हा मार्गाला आता राज्य मार्गाचा दर्जा प्राप्त झाला आहे. आमदार विलासराव जगताप यांच्या प्रयत्नांमुळे राज्य शासनाने हा निर्णय घेतला असून या मार्गाला 385 हा मार्ग क्रमांक मिळाला आहे.
जत तालुक्यातून जाणार्या गुहागर-विजापूर या राष्ट्रीय मार्गाचे काम वेगाने सुरू आहे. शिवाय आणखीही काही हाय वे मंजूर झाले आहेत. या राष्ट्रीय महामार्गाबरोबरच राज्यमार्गाच्या कामांना लवकरच सुरुवात होणार आहे. यामुळे जत तालुक्यातील दळणवळण व्यवस्था सुधारणार आहे. कर्नाटकातून येणारा राज्य मार्ग उमराणी येथून प्रारंभ होणार आहे. पुढे तो खोजनवाडी,जत,निगडी खुर्द,येळवी, खैराव,लोणार, जाडरबोबलाद आणि सोन्याळपर्यंत येणार आहे. हा सुमारे 62.500 किलोमीटर लांबीचा रस्ता आहे.हा राज्य मार्ग कर्नाटकासह सांगली आणि सोलापूर जिल्ह्याला जोडणारा आहे.यापूर्वी हा मार्ग जिल्हा मार्ग असल्याने त्याच्या कामाला मर्यादा पडत होत्या. रस्ता दुरुस्ती होत नसल्याने वाहतुकीवरही मर्यादा येत होती. सध्या हा रस्ता खराब असला तरी आता नव्याने कामाला सुरुवात होणार असल्याने त्याचा फायदा येथील लोकांना, शेतकर्यांना होणार आहे.

No comments:

Post a Comment