Monday, September 10, 2018

होलार समाज संघटनेचा मेळावा उत्साहात


 जत,(प्रतिनिधी)-
 अखिल भारतीय होलार समाज संघटनेचा  राज्यस्तरीय पदाधिकारी व समाज मेळावा  सातारा जिल्ह्यातील म्हसवड ( ता. माण) येथे मोठ्या उत्साहात पार पडला. म्हसवड  शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या क्रांतिसूर्य जोतिबा फुले यांच्या पुतळ्यास अभिवादन करून कार्यक्रमास सुरवात करण्यात आली. प्रमुख पाहुणे माजी जिल्हाधिकारी प्रभाकर देशमुख होते. अध्यक्षस्थानी समाजाचे ज्येष्ठ नेते जयसिंगराव शेलार होते.
मेळाव्यात समाजातील अनेक अडी-अडचणींसंदर्भात चर्चा करण्यात आली. समाजाने शिक्षण, उद्योग, व्यवसाय यात कसे बदल घडवावेत, यासंदर्भात अनेक मान्यवरांनी मार्गदर्शन केले. समाजातील अनेक वादक (संगीत) कलाकारांना मासिक पेन्शनसंदर्भात माहिती देण्यात आली. या मेळाव्यात अनेक युवक समाजबांधवांनी शिक्षण व उद्योग व्यवसायात उल्लेखनीय कार्य केलेल्यांचा सत्कारही करण्यात आला. मेळाव्याचे नियोजन म्हसवड तालुक्याच्या वतीने अखिल भारतीय होलार समाज संघटना गटाचे संस्थापक-अध्यक्ष आबासाहेब ऐवळे व राष्ट्रीय अध्यक्ष प्राचार्य शहाजीराजे पारसे यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आला.
यावेळी सांगली जिल्हाध्यक्ष भगवानदास केंगार, शिक्षक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष भाऊसाहेब व्हनमाने, राष्ट्रीय उपाध्यक्ष मोहन केंगार, समाजाचे ज्येष्ठ नेते लक्ष्मण आवटी, कृष्णा मासाळ, पांडुरंग हेगडे, आटपाडी तालुकाध्यक्ष आबासाहेब ऐवळे, सोलापूरचे जिल्हाध्यक्ष सचिन हेगडे, सामाजिक कार्यकर्ते जीवन केंगार, कैलास केंगार, तासगाव तालुकाध्यक्ष आकाश कांबंळे यांच्यासह विविध गावचे सरपंच, सदस्य व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment