Thursday, September 13, 2018

time please:भाग्यवान कोण?


     राजा दशरथ जेव्हा आपल्या चारही मुलांची वरात घेऊन जनक राजाच्या दारात गेला. तेव्हा जनक राजाने सन्मानपूर्वक वरातीचे स्वागत केले. त्याच क्षणी दशरथ राजाने पुढे येऊन जनक राजाचे पाय धरले. आश्चर्यचकित होऊन जनक राजाने दशरथ राजाचे हात पकडून घेतले आणि तो म्हणाला, ‘महाराज, तुम्ही मोठे आहात आणि वरपक्षाकडचे आहात. तुम्ही हे काय करता?’ यावर दशरथ राजाने खूप सुंदर उत्तर दिले. तो म्हणाला, ’ महाराज, तुम्ही दानशूर आहात. कन्यादान करत आहात. मी तर तुमच्या दारात कन्या घ्यायला आलो आहे. आता तुम्हीच सांगा- देणारा आणि घेणारा यांत कोण मोठे आहे? हे ऐकून जनक राजाच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. भाग्यवान तेच असतात, ज्यांच्या घरी मुली असतात.
 *****
 बंड्या : सर मला उद्या सुट्टी हवी आहे !

 सर : (थोडा विचार करून) तुला सुट्टी हवी असेल तर 1 प्रश्नाचं बरोबर उत्तर दे लगेच सुट्टी देतो.
बंड्या : हो चालेल, विचारा
सर : हा तर मग सांग. कटप्पाने बाहुबली ला का मारलं ?
बंड्या : मला वाटतं, कारण बहुबलीने कटप्पाला सुट्टी दिली नसेल.
सरांनी लगेच बंड्याला 1 महिन्याची सुट्टी दिली !

 रांगोळी पुसली जाणार हे माहीत असूनही ती जास्तीत जास्त रेखीव काढण्याचा आपला प्रयत्न असतो. तसेच, आपले जीवनही पुसले जाणार आहे हे माहीत असूनही आपण ते रांगोळीप्रमाणेच जास्तीत जास्त सुंदर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. माणूस कधीच छोटा किंवा मोठा नसतो. प्रत्येक माणूस आपल्यापरीनं निसर्गाचीएकमेव अप्रतीम कलाकृतीअसतो. कधीही कोणाची कोणाशी तुलना करू नये. अगदी स्वतःचीही !!
 *****
एक आजोबा कोथरुड स्टँडला रिक्षात बसतात. शिवाजी पुतळ्याला रिक्षा थांबवतात.
आजोबा : किती झाले ?
 रिक्षावाला : 32 रुपये
आजोबा 40 रु देतात. रिक्षावाला : सुट्टे नाही आहेत.
 आजोबा : ठीक आहे. जोपर्यंत मीटर मध्ये 40 होत नाहीत तो पर्यंत पुतळ्याभोवती गोल फिरव.
 रिक्षावाला मुकाट्याने सुट्टे पैसे देतो.No comments:

Post a Comment