Monday, September 10, 2018

timepass:धन म्हणजे काय?


धन म्हणजे काय?
वडिलांनी घरी आल्यावर आपल्याला पूर्ण वेळ द्यावा असे जेव्हा मुलांना वाटते तेव्हा वडीलांनी टीव्ही बंद करून आणि स्मार्टफोन बाजूला ठेवून मुलांना दिलेला 100 टक्के वेळ हे मुलांचे ... ‘धन’...
वैवाहिक आयुष्यातील 20 वर्षे पूर्ण झाल्यावरसुद्धा जो आपल्या पत्नीला तिच्या गुणदोषासकट स्वीकारून सांगतोमाझं तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे’’ तो क्षण म्हणजे पत्नीचे... ‘धन
आपल्या मुलाने आपली देखभाल करावी असे वार्धक्यामुळे थकलेल्या आई-वडिलांना जेव्हा वाटते आणि तेव्हा मुलगा ती इच्छा पूर्ण करतो, तो क्षण म्हणजे आई- वडिलांचे ... ‘धन
ह्या तीनही क्षणांचा त्रिवेणी संगम ज्याच्या आयुष्यात होतो ते खरेधनवान’’

*****

जी माणसंदुसर्याच्याचेहर्यावर आनंद निर्माण करण्याची क्षमता ठेवतात, ईश्वरत्यांच्याचेहर्यावरचा आनंद कधीच कमी होऊ देत नाही आणि म्हणूनच ती समाधानी असतात.

 *****

भारताचे लोक हेलमेट घालणार नाहीत पण मोबाईलला स्किनगार्ड नक्की लावणार.... डोकं फुटुन रक्त वाहत गेलं तरी चालेल पण मोबाईलला स्कॅच येता कामा नये!

*****

गेले तीन दिवस कसंतरीच होतंय डॉक्टर. ...  वेगळं काय केलत या तीन दिवसात? 
अं सगळं नेहमीचंच..... फक्त नेट बंद होतं चार दिवस. ...
मग विशेष काही नाही.
 माझं वायफाय वापरा आणि एखादं पोस्ट टाका.
का हो डॉक्टर?
...तुम्हाला बद्धपोस्ट झालंय !No comments:

Post a Comment