Tuesday, September 11, 2018

timeplease:बिचार्‍या नवर्‍यांनी


बुभुक्षितैर्व्याकरणं न भुज्यते पिपासितैः
काव्यरसो न पीयते।
न च्छन्दसा केनचिदुद्ध्रृतं कुलं
हिरण्यमेवार्जय निष्फला गुणाः॥
 भूकेल्यांची भूकव्याकरणखाऊन भागत नाही. तहानलेलेकाव्यरस पिऊन तहान भागवू शकत नाहीत. वेदांच्या ज्ञानाने कोणी घरात बरकत आणू शकत नाही. त्यामुळे धन मिळवावे, धनावाचून नुसतेच असलेले गुण वाया जातात.

 नवीन लग्न झालेले जोडपे बागेत फिरायला गेले होते. अचानक एक कुत्रा त्यांच्याकडे वेगाने धावत येऊ लागला. हा कुत्रा आता आपल्याला चावणार याची दोघांनाही खात्री पटली. कुत्रा मला चावला तरी चालेल पण माझ्या प्रिय पत्नीला काहीच व्हायला नको, असा विचार करुन पतीने पत्नीला दोन्ही हाताने वर उचलले. कुत्रा त्यांच्याजवळ येऊन फक्त जोरजोराने भुंकला आणि काहीही न करता खाली मान घालून निघून गेला. पतीने पत्नीला खाली उतरवले. आपण तिला उचलून कुत्र्यापासून तिचे संरक्षण केले, यामुळे ती आपल्यावर प्रचंड खूश झाली असेल, असा विचार तो करतच होता. तेवढ्यात ती ओरडली, ’कुत्र्याला दगड, लाकूड उचलून मारणारे खूप पाहिले; पण कुत्र्याला फेकून मारण्यासाठी चक्क बायकोलाच उचलणारा तुमच्यासारखा नालायक माणूस मी पहिल्यांदाच पाहिला.’
तात्पर्य : बिचार्या नवर्यांनी काहीही केले तरी बायका कधीच खूश होत नाहीत.

*****
क्षणाला क्षण, दिवसाला दिवस जोडत आयुष्य पुढे जात असते, कधीतरी, कुठे तरी, केव्हा तरी असा क्षण येतो; जो संपूर्ण आयुष्यच बदलून टाकतो, फक्त तो क्षण ओळखता आला पाहिजे, यालाचजगणेम्हणतात.
 *****
मुलीचे वडील : पगार किती तुला?
 पप्पू : सोळा हजार
 वडील : माझ्या मुलीला मी दहा हजार पॉकेटमनी देतो.
 पप्पू : हो, तोच धरुन सोळा हजार पगार आहे!
 मास्तर : बंड्या, सांग बरे, पुण्यालाविद्येचे माहेरघरका म्हणतात?
 बंड्या : विद्याचा जन्म पुण्यातला! ती मोठी झाल्यावर तिच्यासाठी अनुरूप वर संशोधन सुरु झाले. यथायोग्य तिचे लग्नही झाले. मात्र, तिचे माहेर पुण्याचेच असल्याने पुण्याला विद्येचे माहेरघर म्हणतात!
मास्तरांनी बंडयाला धुतला!
*****
ना दूर गेल्याने नाती तुटतात. ना जवळ राहिल्याने जुळतात. हे तर अनुभूतीचे पक्के धागे आहेत. जे आठवण काढल्यानेच मजबूत होतात.


No comments:

Post a Comment