Saturday, October 6, 2018

दैनिक 'संकेत टाइम्स'च्या जत कार्यालयाचे 10 रोजी उदघाटन


जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातून गेल्या तीन वर्षांपासून नियमितपणे प्रसिद्ध होणार्या आणि अल्पावधीत लोकप्रिय झालेले एकमेव दैनिक 'संकेत टाइम्स'च्या जत कार्यालयाचे उदघाटन बुधवार दिनांक 10 ऑक्टोबर रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकूल गाळा क्र.94 याठिकाणी सकाळी 11 वाजता होणार आहे.
संकेत टाइम्स हे दैनिक जत तालुक्यातून निघणारे एकमेव दैनिक असून, गेल्या तीन वर्षांपासून प्रसिद्ध होत आहे. वाचकांच्या अंत:करणात निर्विवाद अग्रस्थान मिळवणार्या संकेत टाइम्सला त्यांचा उदंड प्रतिसाद मिळत असून आता बुधवार दि. 10 ऑक्टोबरपासून संकेत टाइम्सचे कार्यालय सुरू होत आहे. उदघाटनाचा सोहळा सकाळी 11 वाजता होणार असून दुपारी तीन वाजेपर्यंत चहापानाचा कार्यक्रम आयोजित केला असून दैनिकावर उदंड प्रेम करणार्या विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळींनी उपस्थिती दाखवून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन दैनिकाचे संपादक राजू माळी यांनी केले आहे.No comments:

Post a Comment