Thursday, October 11, 2018

आजच्या वर्तमानपत्रातील (दि.12) काही महत्त्वाच्या घडामोडी  इस्लामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक माणिक रंगराव गायकवाड (वय-58, इस्लामपूर) हे इस्लामपूर-बहे मार्गावर स्कूल बस आंणि मोटरसायकल ठार झाले. ही घटना गुरुवारी सायंकाळी घडली.
  स्वाईन फ्लूने बळींची संख्या वाढू लागली आहे. सांगलीतील बालाजीनगरातील अनिक प्रकाश कुलकर्णी (वय-45) यांचे निधन झाले असतानाच माणिकवाडीतील भीमराव निवृत्त खोत (55, माणिकवाडी ता. वाळवा) यांचे निधन झाले. स्वाईन फ्लूने बळी जाणार्यांची सांगली जिल्ह्यातील संख्या आठ झाली आहे.
  सांगली लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडून विशाल पाटील यांच्या नावाची चर्चा असल्याची बातमी आज तरुण भारत या दैनिकाने दिली आहे. जनतेचा अंदाज घेण्यासाठी सर्व्हे केला जात असल्याचेही त्यात म्हटले आहे.
  मिरजेतील अंबाबाई नवरात्र संगीत महोत्सवाच्यावतीने देण्यात येणारा प्रसिद्ध संगीतकार राम कदम पुरस्कार पंडित उपेंद्र भट (पुणे) यांना समारंभपूर्वक देण्यात आला.
  सांगली जिल्हा परिषदेतील पदाधिकारी बदला असा बंडाचा पवित्रा घेणार्या बंडोबांचे लक्ष आता कोअर कमिटीकडे असल्याची बातमी तरुण भारतने दिली आहे. 12 सदस्यांनी बंड झेंडा रोवला आहे.
  सांगली जिल्ह्यात नव्वद हजार हेक्टर ऊस गाळपासाठी सज्ज आहे. गतवर्षाच्या तुलनेत ही 10 हजार हेक्टरने वाढ आहे. जत तालुक्यातले ऊसाचे क्षेत्र 869 हेक्टर इतके आहे.
  जत येथे पंचायत समितीची आमसभा आज असून याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. काँग्रेस आणि सत्ताधारी यांच्यात खडाजंगी होणार असल्याची चर्चा आहे.
  अंगणवाडी इमारत बांधकामासाठी आता शासनाकडून आठ लाख रुपये उपलब्ध होणार आहेत.
  रविवारी ( दि. 14) रोजी सांगलीत शाकाहार संमेलन भरविण्यात येणार आहे. यात डॉ. रावसाहेब पाटील यांचे आयुर्वेद आणि शाकाहार या विषयावर तर डॉ. कल्याण गंगवाल यांचे शाकाहार सर्वोत्तम आहार या विषयावर व्याख्यान होणार आहे.
  आज जागतिक अंडी दिन साजरा केला जात आहे. जिल्हा परिषदांच्या शाळांना पोषण आहारात आज अंडी पुरवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र नवरात्र उत्सव असल्याने घरोघरी घट बसले आहेत. त्यामुळे अंडी दिनाला नवरात्रीमुळे ब्रेक बसणार आहे.
  ताकारी-म्हैसाळसह टेंभू योजनेचे पाणी प्रत्येक शेतकर्यांपर्यंत पोहचण्यासाठी जास्तीत जास्त पंप सुरू करण्याचे आदेश संबंधितांना देण्यात आले आहेत. या संदर्भात सांगलीत बैठक झाली.
  एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानातून सन 2017-18 साठी जिल्ह्यात 452 लाभार्थींना लाभ देण्यात आला आहे.
  जत शहरातील शिवा टेलरचे मालक शिवानंद उत्साही यांची दुचाकी चोरट्यांनी लांबवली आहे.ही घटना काल गुरुवारी घडली. शिवानंद हे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोर असलेल्या बँक ऑफ इंडियाच्या शाखेत कामासाठी आले होते. तिथेच त्यांनी आपली दुचाकी (एमएच 10, एएस 3724) उभी केली होती. बँकेतील काम आटपून बाहेर आल्यावर त्यांना आपली गाडी गायब असल्याचे लक्षात आले. इकडे-तिकडे त्यांनी शोध घेतला,पण गाडी काही मिळून आली नाही. शेवटी त्यांनी काल जत पोलिसांत अज्ञाताविरोधात गाडी चोरीची तक्रार नोंदवली. अलिकडच्या काही महिन्यात दुचाकी चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले आहे. शिवाय गाड्यांचा तपासही लागत नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे.
  महिलांनी अन्याय सहन करू नये, असे आवाहन प्रसिद्ध मराठी अभिनेत्री अलका कुबल यांनी सांगलीत बोलताना केले. त्यांच्या हस्ते आई महोत्सवात आदर्श मातांचा सन्मान करण्यात आला.
No comments:

Post a Comment