Friday, October 12, 2018

संख येथे 14 ला मोफत आरोग्य तपासणी शिबीर


जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील संख येथे श्री हुडेदलक्ष्मी नवरात्र महोत्सव मंडळ आणि सेवासदन लाइफ लाईन सुपरस्पेशालिटी हॉस्पीटल (मिरज) यांच्या संयुक्त विद्यमाने विविध आजार तपासणीचे मोफत आरोग्य शिबीर रविवार दि. 14 ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष सुभाष पाटील यांनी पत्रकारांना दिली.
मूळचे संख येथील हृदयरोग तज्ज्ञ डॉ. रविकांत पाटील यांच्या वैद्यकीय पथकाकडून आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. यात हृादयविकार, मोतिबिंदू,बायपास, मधुमेह, मेंदूविकार, मूत्रविकार, ॅन्जिओग्राफी, ॅन्जिओप्लास्टी, फिट, पॅरालिसिस, डोकेदुखी, चक्कर येणे, स्नायूंचे आजार, हर्निया, मूळव्याध, पित्ताशयातील खडे, अपेंडिक्स, पोटाचे विकार आणि शस्त्रक्रिया याबाबत  मोफत तपासणी आणि मार्गदर्शन करण्यात येणार आहे. गरज पडल्यास ईसीजी,इको,टीएमटी मोफत करण्यात येणार आहे. त्याचबरोबर अॅन्जिओग्राफीदेखील मोफत करण्यात येणार असल्याची माहिती श्री. पाटील यांनी दिली.
ॠम्ख येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेच्या आवारात शिबीर आयोजित करण्यात आले असून सकाळी 10 ते दुपारी 1 या कालावधी नागरिकांनी- रुग्णांनी येऊन आपल्या शरीराची तपासणी करून घ्यावी. महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत पिवळ्या व केसरी रेशनकार्ड धारकांसाठी मोफत उपचार करण्यात येणार असल्याची माहितीही श्री.पाटील यांनी दिली. संपर्कासाठी बी..पाटील (8888315779) व संजय शिंदे (8600395043) यांच्याशी संपर्क साधावा.

No comments:

Post a Comment