Sunday, October 21, 2018

जनधन योजनेची जिल्ह्यात 1.41 खाती


जत,(प्रतिनिधी)
सामान्य जनतेच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी सुरू करण्यात आलेल्या प्रधानमंत्री जनधन योजना, प्रधानमंत्री जीवनज्योती योजना, प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना, अटल पेन्शन योजनांची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी होत आहे. प्रधानमंत्री जबधन योजनेअंतर्गत जिल्ह्यात चालू आर्थिक वर्षात ऑगस्ट अखेर 1 लाख 41 हजार 689 इतके खातेधारक आहेत. योजना सुरू झाल्यापासून आजअखेर 8 लाख 68 हजार 205 खातेधारक झाले आहेत.
प्रधानमंत्री जनधन योजनेंतर्गत शून्य शिलकेवर बँक खाते काढले जात असून 1 लाखाच्या अपघाती विम्याचे या योजनेत संरक्षण दिले आहे. त्याचा कसलाही प्रिमियम खातेदारास भरावा लागणार नाही. जनधन योजनेप्रमाणेच प्रधानमंत्री जीवन ज्योती योजनेंतर्गत वार्षिक हफ्ता केवळ 330 रुपये असून या योजनेत एका वर्षाचे विमा संरक्षण मिळते. प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजनेंतर्गत वार्षिक हफ्ता केवळ 12 रुपये असून योजना कालावधी दरवर्षी 1 जून ते 31 मे असा आहे. बचत खात्यात दरवर्षी 1 जून रोजी 12 रुपये शिल्लक असणे आवश्यक आहे.

No comments:

Post a Comment