Tuesday, October 9, 2018

कास्ट्राईब महासंघाचे राज्य अधिवेशन 17 रोजी नागपूरला

जत,(प्रतिनिधी)-
    कास्ट्राईब कर्मचारी  महासंघ महाराष्ट्र राज्याचे अधिवेशन नागपूर येथे 17 ऑक्टोबर 2018 रोजी होणार आहे.सदर अधिवेशनाचे उदघाटन महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष  म्हणून महासंघाचे अध्यक्ष कृष्णा इंगळे  व इतर प्रमुख पाहुणे  उपस्थित राहणारआहेत.  अधिवेशनात विविध विषयांवर चर्चा व विचारमंथन केली जाणार आहे.
       सदर अधिवेशनात जुनी पेन्शन योजना, नवीन नोकर भरती, भरती अनुशेष यासह  मागासवर्गीय नोकरदार कर्मचारी यांच्या विषयी असलेल्या विविध मागण्या मंत्री महोदयासमोर मांडून पूर्ततेसाठी पाठपुरावा केला जाणार आहे.तसेच अधिवेशनात विशेष सत्कार म्हणून महासंघाचे वरिष्ठ राज्य उपाध्यक्ष तथा सांगली जिल्हाध्यक्ष गणेश मडावी यांना महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून गुणवंत कर्मचारी पुरस्कार मिळाल्याबद्दल सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते  सत्कार केले जाणार आहे.तसेच राज्यातील कर्मचारी अनुशेष भरती व अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती  मागासवर्गीय  पदोन्नती व इतर कर्मचारी यांचे विविध  प्रश्न मांडण्यात येणार आहे. तरी सांगली , सातारा, सोलापूर,कोल्हापूर जिल्ह्यातील कर्मचारी व शिक्षक कर्मचारी सदर अधिवेशनास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे अवाहन विभागीय कार्याध्यक्ष डॉ. बाळासाहेब  व्हनखंडे, कोल्हापूर विभागीय शिक्षक संघटनेचे कार्याध्यक्ष सुरेश संकपाळ, उपाध्यक्ष विजयकुमार सोनवणे, जिल्हा सचिव बाबासाहेब माने, मुख्य संघटक संदेश बोतालजी, उपाध्यक्ष सुखदेव नरळे व  शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रमोद काकडे यांनी केले.

No comments:

Post a Comment