Friday, October 12, 2018

जत येथे 20,21 रोजी टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा

जत,(प्रतिनिधी)-
जत येथील फायटर क्रिकेट क्लबच्यावतीने  20 आणि 21 ऑक्टोबर रोजी दोन दिवशीय भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. या स्पर्धा सांगली रोडवरील क्रीडा संकुल मैदानावर होणार आहेत.
या स्पर्धेसाठी पहिल्या तीन क्रमांकांसाठी सुमारे 25 हजार रुपयांची बक्षीसे आणि चषक देण्यात येणार आहेत. याशिवाय मॅन ऑफ दी मॅच, मॅन ऑफ दी सीरीज आणि उत्कृष्ट गोलंदाज यांनाही बक्षीसे ठेवण्यात आली आहेत. पहिल्या क्रमांकासाठी 14 हजार 444 रुपये, दुसऱ्या क्रमांकासाठी 7 हजार 777 रुपये तर तिसऱ्या क्रमांकासाठी 3 हजार 333 रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे. तर चतुर्थ क्रमांकासाठी 2 हजार 222 रुपये आहे.
या स्पर्धेसाठी 1 हजार 300 रुपये प्रवेश फी ठेवण्यात आली आहे.  या स्पर्धेसाठी लक्ष्मण जखगोंड (बिळूर),लक्ष्मण मोरे, शंकर बिचुकले यांचे सहकार्य लाभले आहे. स्पर्धेसाठी नाव नोंदणीसाठी सुमित जगधने 7517865757,8208482059,आकाश बनसोडे  9175721150, अल्ताफ निपाणी  9834625356 आणि मोसिन शेख  9011933004 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment