Friday, October 5, 2018

जत तालुक्यातील 53 गावे दुष्काळाच्या सावटाखाली


सांगली जिल्ह्यात 246 गावे; सलग दुसर्यावर्षी दुष्काळी परिस्थिती
जत,(प्रतिनिधी)-
सांगली जिल्ह्यातील दुष्काळी जत तालुक्यासह मिरज, तासगाव, कवठेमहांकाळ, आटपाडी तालुक्यात सध्या दुष्काळी परिस्थिती उदभवली असून पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चार्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. शेतीला तर पाणीच नसल्याने खरिप वाया गेला तर आता रब्बीचीदेखील शाश्वती राहिलेली नाही. प्रशासनानेदेखील जिल्ह्यातील पाच तालुक्यातील सद्यस्थिती शासनास सादर केली आहे. सांगली जिल्ह्यात सलग दोन वर्षे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे.

यात पन्नासपेक्षा  कमी आणेवारी असलेली जत, तासगाव, मिरज, कवठेमहांकाळ आणि आटपाडी तालुक्यांतील 246 गावे   आहेत.   या गावांवर दुष्काळाचे प्रचंड मोठे सावट आहे. हवामान खात्याने यंदा चांगला पाऊस पडेल, असा अंदाज व्यक्त केला होता. त्याप्रमाणे वेळेवर पावसाला सुरुवात झाली. काही ठिकाणी पेरण्या केल्या,पण नंतर पाऊसच आला नाही. साहजिकच त्यामुळे पिकाची पुरेशी वाढ झाली नसल्याने पिके वाळून गेली. खरिप पूर्ण वाया गेला. जत तालुक्यात तर पावसाच्या चार महिन्यात एकही मोठा पाऊस झाला नाही.
या पार्श्वभूमीवर प्रशासनाने पीक पाहणी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ग्रामस्तरावरील समितीने पाहणी केली. पाऊस, पेरणी आणि पीक पाहणी करुन खरीप हंगामाचा  प्राथमिक अहवाल जिल्हा प्रशासनाने शासनाकडे सादर केला आहे. त्यात 246 गावांत 50 टक्केपेक्षा कमी पैसेवारी लागली आहे. यात जत तालुक्यातील 53 गावांचा समावेश आहे. या गावांचा प्राथमिक अहवाल विभागीय आयुक्तांमार्फत सरकारकडे सादर करण्यात आला आहे. सुधारित अहवाल या महिनाअखेरपर्यंत आणि अंतिम अहवाल डिसेंबरपर्यंत देण्यात येणार आहे.
जिल्ह्याच्या पूर्वभागात यंदा पावसाची बिकट स्थिती आहे. परतीचा पाऊसही अद्याप पुरेसा झालेला नाही.  यंदा पाऊस पडणार की नाही, याची चिंता शेतकर्यांना लागलेली आहे. बहुसंख्य तलावही कोरडे आहेत. आता फक्त परतीच्या पावसावर शेतकर्यांची आशा विसंबून आहे.पण अजूनही परतीच्या पावसाचे आगमन झाले नसल्याने शेतकर्यांमध्ये कमालीची चिंता आहे. जत तालुक्यात पावसाच्या आशेवर पेरण्या केल्या जात आहे. गेल्या वर्षीच्या खरीप  पाहणीत 258 गावांत 50 पैसेपेक्षा कमी पैसेवारी लागल्याने दुष्काळसदृष्य स्थिती जाहीर केली होती. वीज बिल, शैक्षणिक शुल्कात सवलत देण्यात आली. दुष्काळाची तीव्रता कमी करण्यासाठी सांगली जिल्ह्यातल्या म्हैसाळ पाणी योजनांसह सर्व योजना सुरू करून जिल्ह्यातील सर्व कोरडे तलाव भरून घेण्याची मागणी होत आहे.
पन्नास पैशांपेक्षा कमी आणेवारी असलेली गावे:
जत तालुका: रामपूर, मल्याळ, साळमळगेवाडी, येळदरी, खिलारवाडी, सिंदूर, बसर्गी, गुगवाड, वज्रवाड, बनाळी, अंत्राळ, वायफळ, सिंगणहळ्ळी, मोकाशेवाडी, आवंढी, लोहगाव, येळवी, खैराव, टोणेवाडी, बिरनाळ, कोसारी, वाळेखिंडी, तिप्पेहळ्ळी, नवाळवाडी, धावडवाडी, हिवरे, प्रतापूर,  गुळवंची, बेवनूर, डफ ळापूर, खलाटी, शिंगणापूर, जिरग्याळ, शेळकेवाडी, एकुंडी, मिरवाड, बाज, बेळुंखी, अंकले, डोर्ली, कंठी, वाषाण, बागेवाडी, तिल्याळ, सालेकीरी, माडग्याळ, सोन्याळ, लकडेवाडी, जाडरबोबलाद, सनमडी, कोळगिरी, भिवर्गी, पांडोझरी, करेवाडी (को.बा).
मिरज तालुका:  आरग, बेडग,  लिंगनूर,  खटाव, शिंदेवाडी, लक्ष्मीवाडी, संतोषवाडी जानराववाडी, मालगाव, खंडेराजुरी, गुंडेवाडी, पायाप्पाचीवाडी, सलगरे, चाबूकस्वारवाडी, बेळंकी, कदमवाडी, शिपूर, डोंगरवाडी, एरंडोली, व्यंकोचीवाडी, कानडवाडी, मानमोडी, कवलापूर, रसूलवाडी, काकडवाडी, सांबरवाडी, कांचनपूर, तानंग, सोनी , करोली एम, भोसे, कळंबी, सिध्देवाडी, पाटगाव, टाकळी, बोलवाड,  मल्लेवाडी.
तासगाव तालुका:  तासगाव, वासुंबे, कवठेएकंद, चिंचणी, भैरववाडी, नागाव (.) मतकुणकी, बेंद्री, शिरगाव (.), कुमठे , येळावी, जुळेवाडी, तुरची, राजापूर, ढवळी, वंजारवाडी, निमणी, नागाव (नि), नेहरूनगर, विसापूर, पाडळी, हातनोली, खा.धामणी,  हातनूर, गोटेवाडी, शिरगाव, पानमळेवाडी, लिंब, बोरगाव, आळते, निंबळक, चिखलगोठण, मांजर्डे, आरवडे,  पुणदी,   पेड,  मोराळे (पेड), धोंडेवाडी, बलगवडे, गौरगाव, विजयनगर , नरसेवाडी, किंदरवाडी, कचेरीवाडी, सावळज, सिध्देवाडी, डोंगरसोनी, अंजनी, नागेवाडी, वडगाव, लोकरेवाडी, जरंडी, दहिवडी, वायफळे, बिरणवाडी, यमगरवाडी, बस्तवडे, मणेराजुरी, योगेवाडी, सावर्डे, गव्हाण, वज्रचौंडे, खुजगाव, वाघापूर, कोलगे, लोढे, डोर्ली, उपळावी,  धुळगाव.
कवठेमहांकाळ तालुका: कवठेमहांकाळ, जाधववाडी, झुरेवाडी, नरसिंहगाव (लांडगेवाडी) शिरढोण, जायगव्हाण, अलकूड (एस) नांगोळे, रांजणी, लोणारवाडी, कोकळे, करेलहट्टी, बसाप्पाचीवाडी, कुची, जाखापूर, आगळगाव, शेळकेवाडी, आरेवाडी, केरेवाडी, तिसंगी, कुंडलापूर,  वाघोली, सर्जेवाडी, घाटनांद्रे, देशिंग, मोरगाव, हरोली, बनेवाडी, खरशिंग, बोरगाव, अलकूड (एम), मळणगाव, हिंगणगाव, शिंदेवाडी, विठुरायाचीवाडी, थबडेवाडी, अग्रणधुळगाव, पिंपळवाडी, करोली (टी), म्हैसाळ (एम), रामापूरवाडी, कौंगनोळी, कुकटोळी, सराटी, ढालगाव, कदमवाडी, घोरपडी, शिंदेवाडी (घो), निमज, दुधेभावी, ढोलेवाडी, चौरोची, घुंडेवाडी, जांभूळवाडी, इरळी, लंगरपेठ, ढालेवाडी. 
आटपाडी तालुका: खरसुंडी,  चिंचाळे, वलवण, घाणंद, जांभुळणी, कामथ, मुढेवाडी, काळेवाडी, हिवतड, माळेवाडी, तळेवाडी, बाळेवाडी,  नेलकरंजी, धावडवाडी, मानेवाडी, कानकात्रेवाडी, औटेवाडी, घरनिकी, पिंपरी बुद्रूक, पडळकरवाडी, झरे, विभुतवाडी, पारेकरवाडी, कुरूंदवाडी,  गुळेवाडी,  मिटकी.


No comments:

Post a Comment