Wednesday, October 17, 2018

78 रुपयांत बीएसएनलची धमाकेदार सुविधा


दिवाळीच्या मुहूर्तावर सादर
बीएसएनएलने आपल्या ग्राहकांना कमी रुपयांमध्ये आकर्षक प्लॅन देण्याचा धमाका मागच्या काही दिवसांपासून लावला आहे. सरकारी भागीदारी असलेल्या या कंपनीने नुकताच आपला 78 रुपयांचा एक प्लॅन जाहीर केला आहे. दसरा आणि दिवाळीच्या मुहूर्तावर कंपनीने आपल्या ग्राहकांना खुश करायचे ठरवले असल्याने हा प्लॅन लाँच केला आहे. यामध्ये ग्राहकांना रोज 2 जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा देण्यात आली आहे. या प्लॅनची व्हॅलिडीटी 10 दिवसांची असल्याचेही कंपनीने सांगितले आहे. म्हणजेच कंपनीकडून एकूण जीबी डेटा दिला जाणार आहे. हा प्लॅन 15 ऑक्टोबरपासून लागू करण्यात आला असून देशभरातील ग्राहकांना 3 जी सुविधेअंतर्गत याचा लाभ घेता येणार आहे. विशेष म्हणजे रोमिंगमध्येही अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळणार आहे. रिलायन्स जिओच्या 52 रुपयांच्या प्लॅनला यामध्ये टक्कर मिळणार आहे. यामध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग, 70 मेसेज, रोज 1.05 डेटा आणि जिओच्या अॅप्लिकेशनचे मोफत सबस्क्रीप्शन मिळणार आहे. याआधी कंपनीने 9 आणि 29 रुपयांचे दोन आकर्षक प्लॅन लाँच केले होते. त्याला ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिला होता. हे प्लॅन कंपनीने स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने लाँच केले होते. 9 रुपयांचा प्लॅन 1 दिवसासाठी, तर 29 रुपयांचा प्लॅन 7 दिवसांसाठी असल्याचे कंपनीने सांगितले होते.

No comments:

Post a Comment