Saturday, October 6, 2018

ग्रामपंचायत कर्मचार्‍यांचा 8 रोजी मंत्रालयावर आक्रोश मोर्चा


जत,(प्रतिनिधी)-
महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्यावतीने ग्रामपंचायत कर्मचार्यांच्या विविध मागण्यांसाठी 8 ऑक्टोंबरला मुंबई मंत्रालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहीती संघटनेचे जिल्हा नेते दादासो झुरे व सरचिटणीस अॅड. राहुल जाधव यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.
 ग्रामपंचायत कर्मचार्यांनी आतापर्यंत तालुका पातळीपासुन जिल्हापातळीपर्यंत तसेच नागपूर, मुंबई व दिल्ली अशा विविध ठिकाणी आंदोलने, कोर्ट कार्यवाही केली. त्यांचे फलीतही मिळाले मात्र ते तोकडे आहे. अद्याप शासन व प्रशासनाकडुन कामाचा योग्य मोबदला ग्रामपंचायत कर्मचार्यांना मिळत नाही. राहणीमान भत्ता, रजा, गणवेश या मागण्यांसाठीही झगडावे लागते. नागपूरच्या अधिवेशनामध्ये ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी ग्रामपंचायत कर्मचार्यांना किमान वेतन वाढवुन द्यायचे आश्वासन दिले मात्र याबाबत काहीही शासन आदेश नाही. त्यामुळे ग्रामपंचायत कर्मचार्यांना किमान वेतन 18 हजार रूपये द्या, 90 टक्के वसुलीची जाचक अट रद्द करा यासह प्रलंबित मागण्यांची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी 8 ऑक्टोंबरला आक्रोश मोर्चा काढण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.

No comments:

Post a Comment