Friday, October 5, 2018

टँकर प्रस्तावावर तहसीलदार,गटविकास अधिकारी यांची शिफारस


जत,(प्रतिनिधी)-
जत येथे जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील यांनी तहसील कार्यालय, प्रांत कार्यालय याठिकाणी भेट देऊन टंचाई आराखडा तात्काळ सादर करण्याचा सूचना दिल्या. त्याचबरोबर तहसीलदार व गटविकासाधिकारी यांनी टंचाईग्रस्त भागाची व टँकर मागणी असलेल्या गावाची पाहणी करुन वस्तुनिष्ठ अहवाल सादर करावा. याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविल्या जातात की नाही यांची खात्री करावी, याबाबत तात्काळ पावले उचलावीत, असे आवाहन जतचे प्रांताधिकारी तुषार ठोंबरे यांनी अधिकारी,ग्रामसेवक,तलाठी यांना केले.
 ते म्हणाले, जत तालुक्यात गतवर्षीच्या तुलनेत पर्जन्यमान कमी आहे. त्यामुळेच टंचाईसदृश परिस्थिती आहे. ज्या गावात टंचाई निर्माण झाली आहे, अशा गावात शासनाने नेमून दिलेल्या उपाययोजनांचा अवलंब केला जातो की नाही, याचा विचार करुन तहसीलदार व गटविकासाधिकारी यांनी टँकर प्रस्तावावर शिफारस करावयाची आहे. ज्या ठिकाणी खरोखरच टंचाई आहे, सार्वजनिक स्रोतातून पाणी उपलब्ध होत नाही, अशा ठिकाणी शासन नक्की टँकर देणार आहे.

No comments:

Post a Comment