Monday, October 15, 2018

घराला आग लागून दोन लाखाचे नुकसान


जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील बिरनाळ येथील पांडुरंग हणमंत बंडगर (वय -40) यांच्या घराला आग लागून ज्वारी,गव्हाची पोती, ऊसतोडणीसाठी मुकादमकडून घेतलेली 50 हजार रुपये उचल, दीड तोळे सोन्याचे दागिने आणि संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. यात सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले.
 ही घटना आज (सोमवारी) सकाळी दहा वाजण्याचा सुमारास घडली. स्वयंपाक करून सगळे बाहेर गेले होते. यावेळी चुलीतील विस्तवाने पेट घेऊन ही आग लगतच्या कुडाच्या भिंतींना लागली. आणि यात सर्व काही जळून खाक झाले. सर्वजण शेतात असल्याने अन्य जीवित हानी टळली. या प्रकरणी  तलाठी आर.टी. वाघोली, ग्रामसेवक एम.ए. शिंदे यांनी पंचनामा केला.

No comments:

Post a Comment