Friday, October 5, 2018

खिलारवाडी खूनप्रकरणी आणखी दोघांना अटक


पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल
जत,(प्रतिनिधी)-
 जत तालुक्यातील खिलारवाडी येथील तरुणीच्या खून प्रकरणी आणखी दोघांना जत पोलिसांनी अटक केली. जगन्नाथ बाळासो लोखंडे व त्याला मदत करणारा त्याचा मित्र राजू लक्ष्मण चिंतामणी (रा. वज्रवाड) या दोघा संशयितांना अटक केली. त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली ररहश. त्यांच्यावरपोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.ही फिर्याद मृत तरुणीच्या आईनेही दिली आहे.
 याविषयी अधिक माहिती अशी की, दोन दिवसांपूर्वी खिलारवाडी येथील सुप्रिया सूर्याबा लोखंडे हिचा जन्मदात्या वडिलानेच गळा आवळून खून केला होता. नात्याने चुलतभाऊ असणार्या जगन्नाथ लोखंडे यांच्याशी तिचे अनैतिक संबंध असल्याने यामुळेच समाजात अब्रू जात असल्याचे भीतीने हे कृत्य केले होते. याप्रकरणी सुरुवातीस जगन्नाथ बाळासो लोखंडे यानेच जत पोलिसांत फिर्याद दिली होती. त्यानंतर सूर्याबा लोखंडे यांस पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यास नऊ तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. मृत सुप्रियाची आई मायक्का सूर्याबा लोखंडे यांनीही जत पोलिसांत जगन्नाथ लोखंडे व राजू चिंतामणी यांच्याविरुध्द फिर्याद दिली होती. यात म्हटले आहे की, तिच्या मुलीच्या अज्ञानपणाचा गैरफायदा घेऊन व लग्नाचे आमिष दाखवून अपहरण करण्याचा प्रयत्न संशयित जगन्नाथ लोखंडे याने केला होता. त्यास त्याचा मित्र राजू चिंतामणी याने सहकार्य केले असून या खून प्रकरणाला हे दोघेच सर्वस्वी जबाबदार आहेत, असे म्हटले आहे. मायक्का लोखंडे यांच्या फिर्यादीनुसार जत पोलिसांनी दोन्ही संशयितांवरपोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्यावर कलम 363, 366 ख्र अ 354 ड या कलमान्वये गुन्हा दाखल केला. आहे. या दोन्ही संशयितांना अटक झाली आहे. त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे. अखिक तपास फौजदार आप्पासाहेब कत्ती करीत आहेत.

No comments:

Post a Comment