Thursday, October 18, 2018

शेगावच्या उपसरपंचपदी वर्षा साळुंखे


जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील शेगाव येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी वर्षा महादेव साळुंखे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. सौ. साळुंखे या काँग्रेस पक्षाच्या आहेत. निवडीनंतर ग्रामस्थांच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
शेगाव ग्रामपंचायतीची सदस्य संख्या 13 इतकी आहे. रवींद्र पाटील हे  लोकनियुक्त सरपंच आहेत. काँग्रेस 9, भाजप 4 असे पक्षीय बलाबल आहे. दत्तात्रय निकम यांनी आपल्या उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्यामुळे हे पद रिक्त होते. उपसरपंच पदाची निवड करण्यासाठी विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला सर्व सदस्य उपस्थित होते.
वर्षा साळुंखे यांची यावेळी बिनविरोध निवड करण्यात आली. निवडीनंतर वर्षा साळुंखे म्हाणाल्या, सर्वांना विश्वासात घेऊन गावाचा विकास करण्यासाठी आपण प्रयत्न करू. भाजपसह स्वपक्षीय सदस्यांनी मला बिनविरोध निवड केल्याबद्दल सर्वांचे आभार. विकास कामातही सर्वांनी अशीच साथ द्यावी, असे आवाहन यावेळी त्यांनी केले.
यावेळी सरपंच रवींद्र पाटील, ग्रामसेविका के.जी. गवळी, सदस्या रंजना बुरुटे, ताई हिरवे, सुजाता वाघमोडे, रुपाली ताटे, नीता बुरुटे, महादेव साळुंखे, दत्तात्रय निकम, अस्लम मुजावर, मलकू नाईक, सचिन बोराडे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment