Monday, October 15, 2018

शिंगणहळ्ळी येथे बेकायदेशीर दहा ब्रास वाळू साठा जप्त


जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील शिंगणहळळी  येथील कोरडा नदीच्या पात्रात बेकायदा वाळू साठा करून ठेवल्याची माहिती महसूल विभागाला मिळाल्यानंतर जत तहसीलच्या भरारी पथकाने  छापा टाकून सुमारे दहा ब्रास वाळू जप्त केली.
     परवा खैराव येथे बेकायदा साठा करून ठेवलेली सुमारे आठ ब्रास वाळू तहसीलच्या भरारी पथकाने छापा टाकून पकडली होती. आता शिंगणहळ्ळी येथे अशीच कारवाई करण्यात आली आहे. चक्क नदी पात्रात वाळूचा साठा करून ठेवण्यात आला होता. या कारवाईमुळे वाळू माफिया हादरले आहेत.
जत पंचायत समितीची आमसभा नुकतीच झाली.या सभेत प्रामुख्याने जत तालुक्यात होत असलेल्या वाळू तस्करीवर आवाज उठवण्यात आला होता. शिवाय अधिकारी तस्करांना पाठीशी घालत असल्याचा आरोप झाला होता. यावेळी बेकायदेशीर वाळू उपसा करण्यावर कारवाई करण्यात यावी, असे आदेश आमदार विलासराव जगताप यांनी अधिकाऱ्यांना दिले होते. तहसीलदार सचिन पाटील यांनी दखल घेऊन तालुक्यात भरारी पथकाना कारवाईचे आदेश देण्यात आले. 
        खैराव नंतर शिंगणहळ्ळी येथे बेकायदेशीर वाळू  साठा असल्याची माहिती मिळाल्यानंतर शेगांव मंडल विभागाचे अधिकारी भारत काळे तलाठी अनिल हिप्परकर यांनी शिंगणहळळी येथील कोरडा नदी पात्रात वाळू साठा असल्याची माहिती मिळाल्यानंतर  पथकाकडून  ही कारवाई करण्यात आली व वाळू साठा जप्त करून करून जत तहसील कार्यालयाकडे आणण्यात आली. या प्रकरणी अद्याप कुणावर कारवाई करण्यात आली नाही.

No comments:

Post a Comment