Tuesday, October 2, 2018

तिकोंडीत साठ हजारांचा गांजा जप्त

जत,(प्रतिनिधी)-
उमदी पोलिसांनी  तिकोंडी (ता.जत) येथील प्रकाश  उर्फ वसंत खंडू करे (वय 44) याच्या बाजरीच्या शेतात छापा टाकून साठ हजाराचा गांजा  जप्त केला. या प्रकरणी उमदी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
  प्रकाश करे याने त्याच्या बाजरीच्या शेतात गांजाची झाडे लावली असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार काल रात्री पोलिसांनी छापा टाकला. यावेळी आरोपीच्या शेतात 3ते 4फूट उंचीची 18 झाडे मिळून आली. त्यांचे अंदाजे वजन 12 किलो असून ओलसर उग्र वासाचे गांजाच्या झाडांची किंमत साठ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.  सदरचा  गांजा उमदी पोलिसांनी  जप्त केला आहे तर  गुन्ह्यातील आरोपी फरार झाला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक प्रवीण सपांगे करीत आहेत .
  सदर कारवाईत उमदी पोलिस ठाणेकडील पोलिस उपनिरीक्षक श्री.दांडगे, पो. कॉ. श्रीशैल वळसंग , पो. कॉ. सगर, पो. कॉ. घोदे यांनी सहभाग घेतला.

No comments:

Post a Comment