Tuesday, October 16, 2018

आरक्षण न मिळाल्यास सरकार पाडा


आरेवाडी येथील दसरा मेळाव्यात हार्दिक पटेल यांचे आवाहन

जत,(प्रतिनिधी)-
धनगर समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. तो त्यांचा हक्क आहे आणि तो त्यांना मिळालाच पाहिजे, तो न दिल्यास समाजाने भाजपचे देवेंद्र फडणवीस यांचे सरकार पाड़ावे असे आवाहन गुजरातचे पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी काल केले. गोपीचंद पडळकर यांच्या दसरा मेळाव्यात आरेवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथे बोलत होते.
 पटेल म्हणाले की, धनगर सम ाजाच्या मेळाव्यातीलयेळकोट येळकोट जय मल्हारचा आवाज मुंबईत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कानात गेला पाहिजे. भाजपचे लोक धोकादायक आहेत; भरोसा ठेवण्यासारखे नाहीत. धनगर समाजाची लढाई न्यायाची, अस्तित्वाची आहे. सत्तेसाठी भाजपच्या लोकांनी विविध कट-कारस्थाने रचली. मला देशद्रोही ठरवलं. आम्ही जागरूक नसल्याने ही असे लोकप्रतिनिधी निवडून देतो म्हणून यांचं फावतं. गोपीचंदसारखा तरुण तुमच्यासाठी लढतोय. त्याच्या पाठीमागे उभे राहा. शिवरायांच्या महाराष्ट्रातील तुम्ही अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज आहात. मी आल्यामुळे तुमचा आवाज आता मुंबई नाही, तर दिल्लीत गेला. कार्यक्रमाच्या ठिकाणी पिवळा ध्वज फड़कावून सुरुवात करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवर व्यासपीठावर न बसता स्टेजखाली बसले. सरकारचा निषेध करण्यात आला. कार्यक्रमाच्या ठिकाणी आलेल्या समाजाच्या लोकांनी गजीनृत्य करत ठेका धरला. ’मल्हार - मल्हारया आरक्षणाच्यागाण्याने उपस्थित लोकांनी उभे राहून नाचत मनसोक्त आनंद लुटला. स्टेजवर सर्व बहुजन समाजातील मंडळी व त्यांचे फ़ोटो लावण्यात आले होते.
यावेळी गोपीचंद पडळकर म्हणाले, यापुढे धनगर समाज भाजपसोबत जाणार नाही. गेल्या कित्येक वर्षांत काँग्रेस, राष्ट्रवादीने आमच्यावर अन्याय केला म्हणून आम्ही भाजपसोबत गेलो. भाजपनेही विश्वासघात केला आहे. आमच्यातील एखाद्याला आमदार केलं की सगळं होतेय, अशी त्यांची भावना आहे. पण बांधवांनो, डोळे उघडून नीट बघा. आमदार, खासदार पदाला कोण खातेय? आमदार काय करू शकतो? तो जास्तीत जास्त पाच लाख फंड देऊ शकतो. पडळकर म्हणाले, एस. टी. चे प्रमाणपत्र दिले तरच आमचा प्रश्न मिटतोय. आम्ही भीक मागत नाही. आरक्षण आमचा अधिकार आहे. आम्हाला आरक्षणाचे प्रमाणपत्र दिले नाही तर भविष्यात सत्तेत येऊ देणार नाही. मागील निवडणुकीत धनगरांमुळे भाजपवाल्यांच्या अंगावर गुलाल पडला आहे. या मेळाव्याला मि ळालेल्या प्रतिसादामुळे अनेकांची झोप उडणार आहे. आता मला तुरुंगात कसे टाकायचे, यासाठी प्रयत्न केले जातील. माझी सर्व बहुजनांना विनंती आहे, या व्यवस्थेला तुमच्या ताकदीची जाणीव करू द्या. आम्ही धनगरांना आरक्षण मिळवून देणारच. जर आम्ही आरक्षण मिळवून देण्यात कमी पडलो, तर यापुढे आमच्या घरातील कोणालाही मतदान करू नका.
पडळकर म्हणाले, यापुढील 3 महिने खूप महत्त्वाचे आहेत. आता आरक्षण मिळाले नाही तर कधीच मिळणार नाही. त्यामुळे एकजुटीने लढूया. भाजपवाल्यांच्या 2 कोटी लोकांना धनगरांचा एक आमदार दिला आहे. खरं तर प्रत्येक जातीधर्माच्या पोरांना लोकसंख्येवर आधारित आमदार, खासदार केलं पाहिजे. यापुढील काळात आपण आरक्षणासाठी व्यवस्था ढवळून काढूया. धनगरांच्या आरक्षणासाठी राज्यात हार्दिक पटेल यांना सोबत घेऊन 12 सभा घेणार आहे. माझी समाजबांधवांना विनंती आहे, आमदार खासदारांचा घरात फोटो लावू नका. ते आल्यावर फटाके वाजवू नका. यापुढे कोणाला घाबरायची गरज नाही. कोण आमदार, कोण खासदार? कोण काय करत नाही. इथल्या खासदाराला तर अजिबात घाबरू नका. तो एवढासा आहे. त्याला सीरियसली घेऊ नका. ते म्हणाले, मत मागायला मी फिरत नाही. पण जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही. ज्याटीसनेधनगरआणिधनगडवेगवेगळे आहेत, असे सांगितले त्यांना संवैधानिक अधिकार नाही. ‘धनगरआणिधनगडवेगळे आहेत, हे सांगणारीटीसही संस्था कोण आहे? यापुढे आपणाला आपल्या सन्मानासाठी लढाई लढावी लागणार आहे. हे भाजपवाले फक्त आरक्षण देतो, असे म्हणून राजकीय हवा करीत आहेत.
2019 च्या निवडणुकीत आपल्या समाजाचे 35 आमदार निवडून आले पाहिजेत. सध्या 91 मतदारसंघात धनगर समाजाचे निर्णायक मतदान आहे. त्यातील 78 ठिकाणी भाजपची सत्ता आहे. या सर्व ठिकाणी आम्ही जनजागृती करणार आहे. याठिकाणी पुन्हा भाजपचा उमेदवार निवडून येणार नाही, अशी व्यवस्था करणार आहे. समाजबांधवांनी फक्त आपला स्वाभिमान गहाण टाकू नये. जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत सरकारने 72 हजारांची मेगा नोकर भरती थांबवावी. आम्हाला सरकारने आरक्षण दिले तर मुख्यमंत्र्यांना पालखीतून फिरवू. पण आता आरक्षण मिळाल्याशिवाय थांबणार नाही. उत्तमराव जानकर म्हणाले, जर सरकारने आम्हाला आरक्षण दिले नाही तर सरकारची राजकीय माती लोटणार आहे. आरक्षणासाठी भाजपचे आमदार पराभूत करण्याची वेळ आली आहे. आमची शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी दोन दिवसांपूर्वी भेट झाली होती. जर धनगरांना आरक्षण मिळाले नाही तर हे सरकार पाडणार, असे त्यांनी आम्हाला सांगितले आहे. आम्ही भाजपवाल्यांना एकवचनी रामाची पार्टी समजत होतो. पण ते तर दहा तोंडी रावण निघाले. आमच्यातील काहींनी फितूर होऊन दुसरा एक मेळावा घेण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्या मेळाव्याला एकही सवासीन दिसली नाही, अशी टीका त्यांनी केली.

No comments:

Post a Comment