Saturday, October 13, 2018

खैराव येथे बेकायदा वाळू साठा जप्त


जत,(प्रतिनिधी)-
जत आणि मंगळवेढा तालुक्याच्या सीमेवर असलेल्या खैराव (ता.जत) येथे बेकायदा साठा करून ठेवलेली आठ ब्रास वाळू जत तहसीलच्या भरारी पथकाने पकडून जप्त केली.
जतचे तहसीलदार सचिन पाटील यांना खैराव गावाच्या हद्दीत बेकायदा वाळू साठा करून ठेवल्याची माहिती मिळाली होती.त्यानुसार त्यांनी भरारी पथकास कारवाईचे आदेश दिले. शेगांव मंडल विभागाचे अधिकारी भरत काळे, तलाठी अनिल हिप्परकर,राहूल कोळी, सागर भोसले,बाळासाहेब चव्हाण,विनोद कोळी यांच्या पथकाने ही कारवाई केली. ही वाळू जप्त करून येळवी येथील तलाठी कार्यालयासमोर आणून टाकण्यात आली आहे. हा साठा कोणी केला आहे,याची माहिती नसल्याने कोणावरही कारवाई केली नाही. नाव मिळाल्यास कारवाई करण्यात येईल, असे भरत काळे यांनी सांगितले. यावेळी खैरावचे सरपंच राजाराम घुटुगडे,पोलीस पाटील रामचंद्र पाटील, येळवी सरपंच विजयकुमार पोरे,सचिन माने आदी उपस्थित होते.
 शुक्रवारी रात्री शहरात जत पोलीस गस्थ घालत असताना सचिन काटे हा आपल्या गाडीत दारूचे बॉक्स घेऊन मुचंदीच्या दिशेने निघाला होता.पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर हीरा वाईन शॉपमधून अवैधरित्या दारूची वाहतूक करीत असल्याचे निदर्शनास आले.या प्रकरणी काटे याच्या विरोधात जत पोलिसात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास कोन्स्टेबल वीर करत आहेत.

No comments:

Post a Comment