Thursday, October 4, 2018

शिक्षकप्रश्‍नांवर कपिल पाटील यांनी घेतली असिम गुप्तांची भेट


विविध विषयांवर सकारात्मक चर्चा
जत,(प्रतिनिधी)-
राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या प्रश्नासंदर्भात शिक्षक भारतीचे राज्याध्यक्ष आणि आमदार कपिल पाटील यांच्या उपस्थितीतग्रामविकासचे प्रधान सचिव असिम गुप्ता यांच्याशी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारतीच्या शिष्टमंडळाची बैठक झाली. शिक्षकांच्या विविध प्रश्नांचे निवेदन यावेळी श्री. गुप्ता यांना देण्यात आले. अनेक प्रश्नांवर त्यांनी सकारात्मक चर्चा केली आहे, अशी माहितीशिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष महेश शरनाथे व कृष्णा पोळ यांनी दिली.
राज्यातील वस्तीशाळा शिक्षकांची मूळ नियुक्ती दिनांकापासूनची सेवा वस्तीशाळा शिक्षकांतर्गत सेवाज्येष्ठतेसाठी ग्राह्य धरली असून तीच सेवा चटोपाध्याय वेतन श्रेणी आणि वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ देण्यासाठी ग्राह्य धरण्यात यावी, याबाबत सकारात्मक चर्चा झाली. शिक्षकांसह सर्व कर्मचार्यांनाएमएससीआयटीला मुदतवाढ 31 डिसेंबर 2018 पर्यंत देण्यात यावी, सध्या सुरू असलेली वेतनवाढ वसुली स्थगित करण्यात यावी, रोखण्यात आलेली थकीत वेतनवाढ मिळावी. शिक्षकांना बी.एल.. या अशैक्षणिक कामातून मुक्त करावे. जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थांना मुलींप्रमाणे कोणताही भेदभाव न करता सरसकट सर्वांना मोफत गणवेश मिळावा. जिल्हा परिषद शाळांना वीज, संगणक, इंटरनेट या सुविधा मोफत देण्यात याव्यात आदी मागण्यांबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी राज्याध्यक्ष नवनाथ गेंड, सरचिटणीस भरत शेलार, उपाध्यक्ष दिनेश खोसे, विभागीय अध्यक्ष प्रकाश ब्राम्हणकर, सांगली जिल्हाध्यक्ष महेश शरनाथे, सरचिटणिस कृष्णा पोळ, सोमनाथ रेपाळ, दिगंबर सावंत, दिनकर जेवे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment