Sunday, October 14, 2018

बागलवाडी शाळेत हँडवॉश स्टेशनची उभारणी


जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील बागलवाडी येथील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेच्या आवारात जिल्हा परिषद सदस्या स्नेहलता जाधव यांच्या स्थानिक निधीतून हँडवॉश स्टेशन बसवण्यात आले आहे. याचे नुकतेच सौ. जाधव यांच्याहस्ते उदघाटन करण्यात आले.
यावेळी ग्रामपंचायतीच्यावतीने 14 व्या वित्त आयोगातून संगणक आणि प्रिंटरही देण्यात आला. यावेळी बोलताना सौ. जाधव म्हणाल्या की, जत तालुक्यातील प्राथमिक शाळांचा दर्जा सुधारत असून शाळा डिझिटल होत आहेत. याचा नक्कीच लाभ ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना होईल. मतदारसंघातील सर्व शाळा डिझिटल होण्याच्यादृष्टीकोनातून प्रयत्न सुरू आहेत. अजिंक्यतारा विद्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष व भाजपचे नेते प्रभाकर जाधव यांनी शिक्षकांनी शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाला पंचायत समिती सभापती शिवाजी शिंदे,सरपंच लक्ष्मी राजेंद्र खांडेकर,कु. ज्योती कुंभार, उअपसरपंच संतोष मुंजे, प्रा. एन. के. हिप्परकर, डॉ. शिवाजी खिलारे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुभाष खांडेकर, शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष विनायक शिंदे, येळवी येथील सावली फौंडेशनचे सुनील साळे, उद्धव शिंदे, अमोल गायकवाड, यांच्यासह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्याध्यापक श्री. गुदळे यांनी प्रास्ताविक व स्वागत केले तर आभार श्री. मुरकुटे यांनी मानले.

No comments:

Post a Comment