Monday, October 22, 2018

जत येथे मंगळवारी श्रीमायाक्कादेवी व भाग्यवंतीदेवीची यात्रा


जत,(प्रतिनिधी)-
 सालाबादप्रमाणे जत येथील मायाक्कादेवी व भाग्यवंतीदेवी यांच्या कोजागरी पौर्णिमेस (मंगळवार) भरविण्यात येणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत, अशी माहिती यात्रा कमिटी अध्यक्ष बसवराज अलगूर यांनी दिली. ते म्हणाले की, मंगळवारी श्री मायाक्कादेवी व श्री भाग्यवंतीदेवी मूर्तीस पहाटे अभिषेक व महापूजा, सकाळी भजन व देवीच्या गाण्याचा कार्यक्रम, दुपारी महाप्रसाद, देवीच्या पालखीची ग्राम फेरी (छबिना मिरवणूक) सायंकाळी पारंपरिक हेडाम खेळणे व पुजारी महाराज यांची भाकणूक, रात्री धनगरी ओव्याचा कार्यक्रम होणार आहे. यावेळी सुवर्णा अलगूर, राघवेंद्र अलगूर, विजय यमगर, शांता यमगर उपस्थित होत्या.

No comments:

Post a Comment