Tuesday, October 9, 2018

देवनाळमध्ये समाधान मेळाव्याचे उद्घाटन


जत,(प्रतिनिधी) जत तालुक्यातील देवनाळ गावामध्ये महसूल विभाग, वनविभाग, पंचायत समिती आणि टाटा कम्युनिटी डेव्हलपमेंट ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच समाधान मेळावा पार पडला. मेळाव्याचे उद्घाटन तहसीलदार सचिन पाटील व गटविकास अधिकारी अर्चना वाघमळे यांच्या हस्ते करण्यात आले.
 यावेळी शासकीय व निमशासकीय खात्याकडील विविध प्रकारच्या सुविधा व योजना प्रत्यक्ष एकाच छताखाली उपलब्ध करून देण्याचा एक लोकाभिमुख उपक्रम राबविण्यात आला. याप्रसंगी नायब तहसीलदार शेट्यापगोळ, सदाशिव जाधव, प्रा. सन्नके, उपसरपंच कुंभार, ग्रामसेवक कामेश्वर ऐवळे, विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होत

No comments:

Post a Comment